Sanjay Raut News: गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील दोन मोठे नेते, विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि खासदार संजय राऊत यांच्यात शीतयुद्ध रंगले आहे. दोन्ही नेते नाव न घेता, तर कधी थेटपणे एकमेकांच्या विरोधात बोलत आहेत. आता दोन्ही नेत्यांमधील हा वाद मिटण्याची चिन्ह दिसत आहेत.
"कोण संजय राऊत?" असा उलटा प्रश्न अजित पवारांनी पत्रकारांना विचारला. 'सामना'च्या रोखठोकमधून संजय राऊत यांनी शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फुटीच्या मार्गावर असल्याचे भाष्य केले होते.
राऊतांनी दिलेल्या या माहितीला अजित पवारांनी त्यांच्य स्टाईलमध्ये 'रोखठोक'उत्तर दिले. "मी कुणाचं नाव घेतलं नव्हतं. कुणी अंगाला का लावून घ्यावं,मी माझ्या पक्षासंदर्भात बोललो होतो." असे सणसणीत टोला अजित पवारांनी राऊतांना लगावला.
अजित पवारांच्या टीकेवर राऊतांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, "अजित पवार गोड माणूस आहे. आम्ही सर्व त्यांच्यावर प्रेम करतो. माझे पवार कुटुंबातील कोणाशी वाद नाहीत. कधीच नव्हते,"
"अजित पवार आणि मी एकत्र जेवलो आहे. पुन्हा एकत्र जेऊ. अजित पवार गोड माणूस आहे. आम्ही सर्व त्यांच्यावर प्रेम करतो. अजित पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख घटक आहेत. आमच्यामध्ये फुट पाडण्याचा भाजपचा डाव आहे.आम्ही हा डाव हाणून पाडू," असे राऊत म्हणाले.
"सध्या महत्त्वाचा मुद्दा खारघर येथील श्रीसेवकांच्या मृत्यूचा आहे. त्यावर आम्ही बोलत आहोत. या घटनेत ५० श्रीसेवकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. या मागणीशी मी सहमत आहे. तसेच या घटनेसाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे म्हणणे आहे. पटोले यांचे हे म्हणणे रास्त आहे, असे राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.