Sharad Pawar News: अदानींच्या भेटीवरुन शरद पवारांना तृणमूल खासदारांचा टोला; "अदानी हमाम में सब…,

MP Mahua Moitra Criticizes Sharad Pawar: महुआ मोइत्रा यांनी टि्वट करीत अदानी-पवार भेटीवर भाष्य केलं आहे.
Sharad Pawar, Mahua Moitra
Sharad Pawar, Mahua Moitra Sarkarnama
Published on
Updated on

Trinamool MP Mahua Moitra Criticizes Sharad Pawar : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी काल (गुरुवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. त्याचा तपशील मात्र जाहीर करण्यात आला नाही.

या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी सस्पेन्स निर्माण झाला आहे. अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांचा काही ‘विशेष निरोप’ घेऊन तर अदानी पवारांना भेटले नसतील ना? असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत.

Sharad Pawar, Mahua Moitra
Ajit Pawar News : कोण संजय राऊत ?; अजितदादांनी वात पेटवली...

अदानी-पवार यांच्या भेटीत काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. या भेटीवरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या, खासदार महुआ मोइत्रा यांनी टि्वट करीत अदानी-पवार भेटीवर भाष्य केलं आहे.

आपल्या ट्विटरवरून महुआ यांनी वृत्तपत्राचे कटिंग शेअर केले आहे. ‘अदानी हमाम में सब नंगे है’, असे त्याला कॅप्शन दिले आहे. महान मराठ्यांचा सामना करताना मला भीती वाटत नाही. जुन्या संबंधांपेक्षा देशाला प्राधान्य देण्याची जाणीव त्यांच्याकडे असेल, एवढीच अपेक्षा आहे. तसेच, माझे ट्वीट विरोधकांच्या एकजुटीविरोधी नाही, तर जनहिताच्या बाजूने आहे, असेही महुआ मोइत्रा यांनी म्हटले आहे.

महुआ मोइत्रा यांनी दावा केला की, या प्रसिद्ध उद्योगपतीने आपल्या ‘मित्रां’मार्फत तिच्यासह इतरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. अदानींशी समोरासमोर चर्चा करण्यासारखे आपाल्याकडे काही नाही, असे सांगून महुआ म्हणाल्या की, जोपर्यंत सरकार कारवाई करत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकारण्याने त्यांच्याशी संबंध ठेवू नये.

राजकारणी व उद्योगपतींच्या मैत्रीत गैर काय, वेगळे अर्थ काढू नये, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तर पवार- अदानींचे जुने संबंध आहेत. पवार यांचे सहकार्य घेण्यासाठी अदानी गेले असतील,असा टोला काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला.

Sharad Pawar, Mahua Moitra
Ajit Pawar On Pune Loksabha: प्रशांत जगतापांना अजितदादांनी दिल्या शुभेच्छा; पुण्याच्या जागेबाबत सूचक विधान

राजकीय वर्तुळाने असे लावले तर्कवितर्क

  • जेपीसी मुद्द्यावर चर्चेसाठी काँग्रेसने पुढील आठवड्यात दिल्लीत विरोधकांची बैठक बोलावली. त्यात इतरांचेही मन वळवण्यासाठी पवारांना साकडे घातले असावे.

  • हिंडेनबर्गप्रकरणी अदानी समूहाची जेपीसी चौकशीच्या मागणीस विरोध केल्यामुळे पवार यांचे आभार मानण्यास आले असावेत अदानी.

  • सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाविरोधात गेल्यास राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता टिकवण्याची भाजपची धडपड सुरू आहे. त्यास अजितदादा व ४० आमदार तयार आहेत. पण शरद पवार राजी नाहीत. त्यांचे मन वळवण्यासाठी भाजपचा ‘निरोप’ घेऊन आले असावे अदानी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com