Vaibhav Naik- Sunil Shelke Sarkarnama
मुंबई

Sunil Shelke News : आधी शरद पवार गटाच्या खासदाराला निवडून आणलं, आता ठाकरेंचा आमदार..? वैभव नाईकांचा मित्र सुनील शेळकेंबाबत भलताच कॉन्फिडन्स

Jagdish Patil

Mumbai News : विधान परिषदेची निवडणूक येत्या शुक्रवारी (12 जुलैला) होणार असल्याने या निवडणुकीत विजयासाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे विधिमंडळाच्या आवारात अनेक राजकीय नेत्यांची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक देखील विधिमंडळाच्या आवारात एकमेकांशी हास्यविनोद करताना पहायला मिळत आहेत.

मुंबई येथे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. विधानसभेच्या आवारात बुधवारी शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे आमदार वैभव नाईक आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शिलेदार आमदार सुनील शेळके यांच्यात जुगलबंदी रंगल्याचे पहायला मिळाले. विधान परिषदेच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे आमदार फुटतील आणि आमचाच विजय होईल असा दावा या दोन्ही आमदारांनी केला. आमदार सुनीलअण्णा शेळके यांचा आम्हाला पाठींबा आहे. अण्णांसारख्या मित्रांमुळे आमचा विजय निश्चित आहे, असा दावा ठाकरे गटाचे आमदार नाईक यांनी करून खळबळ उडवून दिली.

विधान परिषद निवडणुकीत आमचे तीनही उमेदवार निवडून येतील अण्णांसारखी काही मित्र आम्हाला मदत करतील लोकसभा निवडणुकीनंतर आम्हाला याची शास्वती आली आहे.असे काही मित्र असल्यामुळे आमचा तिसरा उमेदवार विजयी होईल असा विश्वास व्यक्त करत. वैभव नाईक यांनी सुनील शेळके यांच्यासमोरच ते आमच्या सोबतच असल्याचा दावा केला.

आमदार नाईक यांनी केलेल्या दाव्यावर अजितदादांचे आमदार शेळके यांनीही मिश्किलपणे प्रतिक्रिया देत ठाकरे गटाचे आमदार नाईक यांचा दावा खोडून काढत महायुतीचेच सर्व उमेदवार विजयी होतील, असे सांगितले. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार असून यासाठी 12 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात महायुतीचे 9 उमेदवार तर महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार निवडणूक लढणार आहेत.

या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लक्ष घातले आहे. महायुतीत सहभागी असलेल्या शिवसेना,भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह सर्व घटक पक्ष आणि समर्थक अपक्ष आमदारांची एकत्र मोट मुख्यमंत्री शिंदे यांनी बांधली असून कोणत्या पक्षांनी कोणत्या उमेदवाराला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाने मतदान करायचे आहे, याचे संपूर्ण नियोजन शिंदे यांनी हाती घेते आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT