Eknath Shinde : विधान परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांचा मास्टरप्लॅन तयार, महाविकास आघाडीला देणार धक्का !

Legislative Council Election 2024 : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार असून यासाठी 12 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात महायुतीचे 9 उमेदवार तर महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार निवडणूक लढणार आहेत.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधान परिषदेची निवडणूक लढविणाऱ्या महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्यासाठीचा मास्टरप्लॅन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयार केला आहे. यासाठीचे नियोजन शिंदे यांनी केले असून या निवडणुकीच्या प्रचारासाठीची सर्व सुत्रे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यानुसार नियोजन केले जात आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. हे सर्व उमेदवार महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार असून या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना धक्का देण्याची तयारी देखील शिंदे यांनी केली आहे.

CM Eknath Shinde
Tanaji Sawant : तानाजी सावंतांची मोठी चलाखी, 'एचएलएल लाइफकेअर'ला फुकटची दोन हजार कोटींची हमी

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार असून यासाठी 12 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात महायुतीचे 9 उमेदवार तर महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार निवडणूक लढणार आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या 5 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत,परिणय फुके,अमित गोरखे आणि योगेश टिळेकर यांना भाजपने (BJP) उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना मैदानात उतरवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना तर शिवसेना शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी दिली आहे.

CM Eknath Shinde
Worli Hit And Run Case : वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात मोठी अपडेट! आरोपी मिहीरचे वडील राजेश शाह यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी

महायुतीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढविलेल्या महायुतीला अनेक जागांवर पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यामुळे या विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्वच महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठीचा मास्टरप्लॅन तयार करण्यात आला आहे.

शिवसेना चेंबर मध्ये झालेल्या बैठकीत याबाबतची रणानिती ठरविण्यात आली. त्यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. महायुतीत सहभागी असलेल्या शिवसेना,भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह सर्व घटक पक्ष आणि समर्थक अपक्ष आमदारांची एकत्र मोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांधली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महायुतीमधील महत्वाचे पक्ष,घटक पक्ष आणि समर्थक, अपक्ष आमदारांशी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपर्क ठेवून आहेत. महायुतीचे सर्व 9 उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीचे निर्णायक मतं, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं कशी आणि कोणाला द्यायची, याची सांख्यिकी रणनिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवली आहे. त्यानुसार महायुतीतील सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी बैठका, चर्चा मुख्यमंत्री शिंदे करत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com