Radhakrishna Vikhe patil : "आरक्षणाचे खरे शत्रू कोण? मराठा समाजाने ओळखावे"; मंत्री विखेंचा निशाणा कोणावर?

Radhakrishna Vikhe patil On Mahavikas Aghadhi : भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीला चांगले सुनावले.
Radhakrishna Vikhe patil
Radhakrishna Vikhe patil sarkarnaa

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून आजच्या विधिमंडळाच्या कामकाजात सत्ताधाऱ्यांनी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायचा नाही, असे सांगून एकमेकांकडे बोट दाखवले.

यातच भाजप नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे ( Radhakrishna Vikhe patil ) यांनी 'आरक्षणाचे खरे शत्रू कोण?' आता मराठा समाजाने ओळखावे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे रोख नेला. शरद पवारांनी एकदा 'एक मराठा, लाख मराठा', असे म्हणून दाखवण्याचे आव्हान मंत्री विखे यांनी दिले.

शरद पवार ( Sharad Pawar ) यांचे नाव न घेता मंत्री विखे म्हणाले, "चार वेळा मुख्यमंत्री राहून सुद्धा एकदाही मराठा आरक्षणाच्या बाजूने त्यांनी भूमिका घेतली नाही. केवळ मताचे राजकारण करत समजा-समाजात दुही माजवयाची आणि आपली राजकीय समीकरणे मांडायची. समाजातील लोकांना झुलवत ठेवण्याचे मोठे षडयंत्र आखले जात आहे."

Radhakrishna Vikhe patil
Radhakrishna Vikhe Patil : 'ना खाऊंगा, ना खाने दूंगा'; मंत्री विखेंचे बेकायदेशीरपणे आदिवासीच्या जमिनी लाटणाऱ्यांवर कारवाईचे आदेश !

मराठा आरक्षणावर महायुतीने मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला महाविकास आघाडीने न जाण्याचा निर्णय घेतला. त्यावरून आज विधानसभेत गदारोळ झाला. महायुतीच्या सर्व नेत्यांनी विरोधीपक्षाला धारेवर धरत बैठकीला येण्यापासून तुम्हाला कोणी रोखले? कोणाचे मेसेज आले? याचा खुलासा करण्याची जोरदार मागणी केली. याच मुद्द्यावरून मंत्री विखे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.

मंत्री विखे यांनी नाव न घेता शरद पवारांवर आरोप केले आहेत. "चार वेळा मुख्यमंत्री राहूनही त्यांनी आजतागायत मराठा आरक्षणाच्या बाजूने कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नाही. कधी मराठा आरक्षणाच्या बाजूने शब्द काढला नाही. ते कोणत्याही मोर्चात दिसले नाहीत. त्यांनी कधीही आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका समाजाच्या समोर मांडली नाही," अशा परखड शब्दात मंत्री विखे यांनी पवारांवर निशाणा साधला.

त्याचबरोबर मंत्री विखे यांनी महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री केवळ फेसबुकवर होते. तर त्यांचे नेते रिमोटकंट्रोल वर काम करत राहिले. यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण गमवावे लागले असल्याचा थेट आरोप केला.

Radhakrishna Vikhe patil
Assembly Session : मराठा अन् ओबीसी आरक्षणावरून राडा, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर सोडले शब्दांचे अस्र; मग अध्यक्षांनी...

मराठा आरक्षणाच्या शत्रूंना गावबंदी करावी

आजही समाजाची दिशाभूल करण्याचे काम विरोधक आणि महाविकास आघाडीचे नेते करत असल्याची टिका करून मंत्री विखे यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना आवाहन केले की, "त्यांनी मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे आतातरी ओळखावे आणि अशा नेत्यांना गावबंदी करावी."

मंत्री विखेंनी वेगळी प्रेमाचा निषेध केला

"महायुती सरकार हे मराठ्यांच्या बाजूने असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. यासाठी सरकारने एक पाऊल पुढे येऊन सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकून ते मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. यामुळे त्यांच्या या बेगडी मराठा प्रेमाचा आम्ही निषेध करत असल्याचे मंत्री विखे म्हणाले.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com