NCP, BJP
NCP, BJP Sarkarnama
मुंबई

Death Threat to Sharad Pawar : दंगली घडवूनच भाजप सत्तेवर; राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपला जशास तसं उत्तर

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra BJP-NCP Politics : ठिकठिकाणी दंगली घडत असल्याने राज्य अशांत झाले आहे. अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी देण्यात आली. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. शरद पवार विरोधात असतात त्यावेळीच राज्यात दंगली घडतात, असा आरोप दरेकरांनी केला. यामुळे राज्यात नवीन वादाला सुरूवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

प्रवीण दरेकर म्हणाले, "जेव्हा जेव्हा शरद पवार (Sharad Pawar) किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेबाहेर राहिला तेव्हाच या राज्यात अनेक दंगली झाल्याचा इतिहास या महाराष्ट्राने (Maharashtra) पाहिला. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्याचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रकार सध्या सुरू आहे." दरेकरांच्या या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

दरेकरांनी केलेल्या शरद पवार यांच्यावरील आरोपांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी समाचार घेतला. चव्हाण म्हणाल्या, "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कोरेगाव भीमा प्रकरणात अनेक गाड्या जाळल्या गेल्या. यावेळी दलित समाजला लक्ष्य करण्यात आले होते. त्याची चौकशी का केली नाही? अजूनपर्यंत भिडे आणि एकबोटे यांना अटक का केली नाही? आता महाविकास आघाडीची सत्ता येणार असे दिसत असल्याने अशा प्रकारची विधाने केली जात आहेत."

Riot in Maharashtra दंगली घडवण्याचा इतिहास भाजपचाच असल्याचा पलटवारही चव्हाण यांनी दरेकरांवर केला आहे. त्या म्हणाल्या, "आता भाजप दंगली घडवूनच सत्तेवर आल्याचा इतिहास आहे. दोन जागांवरून सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कायम दंगली घडवल्या आहेत. बाबरीसारखी अनेक उदाहरणे देता येतील. आताही भाजपला फक्त फक्त निवडणुकीचे ध्यास लागले आहेत. एकदा दंगे घडवून सत्ता मिळाली आहे. आता राज्याची सुज्ञ जनता तसे होऊ देणार नाही."

फडणवीसांनी स्वतःच आपली प्रतिमा मलिन करून घेतल्याचेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले. विद्या चव्हाण म्हणाल्या, "देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गृहखाते असूनही ते कारभार चांगला करताना दिसत नाहीत. हे भीमा कोरेगाव प्रकरणापासून दिसून येत आहे. महिला वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नसतात. तेथे पुरुष सुरक्षारक्षक असतात. यामुळेच सावित्रीबाई फुले वसतीगृहातील घटना घडली. अशा गोष्टींकडे फडणवीस यांना लक्ष द्यायला वेळ नाही. अनेक महिला राज्यातून गायब झाल्या आहेत. त्याचे रेकॉर्ड नाही. गृहमंत्री म्हणून फडणवीस भीमा कोरेगाव प्रकरणापासून फेल झाले आहेत. फडणवीसांनी स्वतःच आपली प्रतिमा मलिन करून घेतली."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT