Shahaji Patil News : ...तर मी विधानसभेची आगामी निवडणूक लढवणार नाही; शहाजी पाटलांनी कोणाला दिले आव्हान

विकास कामांचा ओघ वाढण्यासाठी आढळराव पाटील यांना दिल्लीत पाठविण्याचे काम करा
Shahaji Patil
Shahaji PatilSarkarnama
Published on
Updated on

Manchar (Pune) : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी १९९० मध्ये आमदार झाल्यापासून आजतागायत त्यांनी आंबेगाव मतदारसंघासाठी जेवढा निधी आणला आहे, तो सर्व निधी एकत्र करा. माझ्या सांगोला विधानसभा मतदार संघात गेल्या चार वर्षांत मी आणलेला निधी त्याच्यापेक्षा दुप्पट आहे. जर माझा निधी कमी भरला, तर यापुढची आमदारकीची निवडणूक लढवणार नाही, असे आव्हान आमदार शहाजी पाटील यांनी वळसे पाटील यांना दिले. (...then I will not contest the upcoming assembly elections: Shahaji Patil)

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून आणि आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून मंचर शहरासाठी मंजूर झालेल्या २६ कोटी रुपये निधीतील विकास कामांचे भूमिपूजन शहाजी पाटील व आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शहाजी पाटील (Shahaji Patil) बोलत होते.

Shahaji Patil
Eknath Shinde On Death Threat पवारांना आलेल्या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांचे ट्विट; म्हणाले, ‘त्यांच्याबद्दल आम्हा सर्वांनाच आदर....

शिरूर लोकसभा मतदारसंघात ज्यांना तुम्ही निवडून दिले ते खासदार डॉ.अमोल कोल्हे गेल्या चार वर्षांत मतदार संघात फिरकलेही नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. खासदार नसतानाही गावोगावी जनसंपर्क ठेवून विकास कामांसाठी निधी आणण्याचे काम माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील करत आहेत. त्यांनी गेली १५ वर्ष लोकसभेत प्रभावीपणे काम केले आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी आहेत. आगामी काळात विकास कामांचा ओघ वाढण्यासाठी आढळराव पाटील यांना दिल्लीत पाठविण्याचे काम करा, असे आवाहन आमदार पाटील यांनी आंबेगावातील जनतेला केले.

Shahaji Patil
Chitra Wagh Vs Jitendra Awhad : चित्रा वाघ-जितेंद्र आव्हाड ट्विटरवर भिडले; ‘एंटी चेंबर’ ते ‘कुलू मनाली’ सगळंच चव्हाट्यावर आलं

पाटील म्हणाले की, आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यतीसाठी केलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. गेल्या निवडणुकीत जनतेने भावनेच्या आहारी जाऊन मतदान केले. त्याचे परिणाम आपण सध्या पाहत आहोत. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व कामे करणाऱ्या नेतृत्वाला लोकसभा निवडणुकीत जनतेने साथ द्यावी. गेल्या चार वर्षांत आढळराव यांनी आणलेला निधी फार मोठा आहे.

आढळराव म्हणाले की ‘‘माझा जन्म लोकांमध्ये राहण्यासाठी आणि लोकांची कामे करण्यासाठी आहे. खासदार नसतानाही चार वर्ष सतत लोकांमध्ये राहिलो. पालकमंत्री अजित पवार असताना निधीसाठी मला फार त्रास सहन करावा लागत होता. मात्र, मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे मतदार संघासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. माझ्या उमेदवारीबाबत शिंदे व फडणवीस निर्णय घेतील.”

Shahaji Patil
Katraj Dairy : पुणे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आठ संचालकांची अजितदादांकडे फिल्डिंग; 'त्या' संचालकांमुळे पवारांचीही कसोटी

या वेळी माजी आमदार शरद सोनवणे, अरुण गिरे, डॉ. ताराचंद कराळे, सुनील बाणखेले यांची भाषणे झाली. सागर काजळे, जयसिंगराव एरंडे, रवींद्र करंजखेले, योगेश बाणखेले, स्वप्नील बेंडे, राम तोडकर, प्रवीण थोरात पाटील, संदीप बाणखेले, प्रमोद बाणखेले, कल्पेश बाणखेले, सुशांत थोरात उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com