Baba Siddique, Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Baba Siddique : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील तपासाबाबत अजित पवारांनी दिली मोठी अपडेट

Ajit Pawar ON Baba Siddique : "काल रात्री दु:खद घटना घडलेली राज्यासह संपूर्ण देशाने बघितली. हरहुन्नरी असं व्यक्तीमत्त्व आपल्यातून निघून गेलं. मी त्यांना खूप आधीपासून ओळखतो ते तीन टर्म आमदार होते शिवाय त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे."

Jagdish Patil

Baba Siddique Shot Dead : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांचा शनिवारी रात्री गोळीबारात मृत्यू झाला. सध्या कूपर रुग्णालयात त्यांचा मृतदेह रुग्णालयात आहे. या रुग्णालयाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली.

या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगितलं. शिवाय त्यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात महत्वाची अपडेट देखील अजित पवारांनी दिली.

ते म्हणाले, "काल रात्री दु:खद घटना घडलेली राज्यासह संपूर्ण देशाने बघितली. हरहुन्नरी असं व्यक्तीमत्त्व आपल्यातून निघून गेलं. मी त्यांना खूप आधीपासून ओळखतो ते तीन टर्म आमदार होते शिवाय त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे."

बाबा (Baba Siddique) हे सर्वांशी मिळून मिसळून राहणारं ते व्यक्तीमत्त्व होतं. मधल्या काळात ज्या काही घटना घडल्या त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला. मात्र, त्यांच्यावर अचानक भ्याड हल्ला झाला त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या हत्येप्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं असून चार पाच टीम इतर राज्यात शोध घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.

बाबा सिद्दीकी यांचा परिवार अत्यंत अतिशय शोकाकुल अवस्थेत आहे. शिवाय त्यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम अर्ध्या तासात पूर्ण होईल. त्यांनंतर ते घरी नेली जाईल आणि दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मरीन लाईन्सला बडा कब्रस्तानात त्यांच्या देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

अशा घटनांवर राजकारण करणं दुर्देवी

दरम्यान, या घटनेवर राजकारण केलं जात आहे ते अत्यंत दुर्देवी असल्याचंही अजित पवार म्हणाले. तर या घटनेसंदर्भात पोलिसांना काही अंदाज आला आहे. यंत्रणा काही वेळ मागत आहे. शिवाय मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी तपासाच्या सूचना दिल्या असून मी देखील माझ्या पातळीवर सूचना दिल्या आहेत. आम्ही सगळे त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आहोत, असं अजितदादा म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT