NCP News : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका सुरु आहेत. आज पुण्यात बैठक झाली. या बैठकीला जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमध्ये नाराज असल्याची चर्चा काही दिवसापासून सुरु आहे. कार्यकर्त्यांमधील धुसफूस आज (गुरुवारी) समोर आली. (NCP Sharad Pawar news)
राष्ट्रवादीच काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी आज पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यांच्या उपस्थितीतच काही कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
"पक्षांमधील गट तट संपले तर निश्चितपणे,पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता येऊ शकते," असे एका पदाधिकाऱ्याने शरद पवारांना सांगितले. पदाधिकाऱ्यांच्या या नाराजीमुळे पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
शिरूर व बारामती या तालुक्यातील आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होती. या बैठकीबाबत माजी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी माहिती दिली. दत्तात्रेय भरणे म्हणाले, "
प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकीचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेत्यांची काय मदत घेता येईल याची माहिती दिली,"
"राष्ट्रवादीची जिल्ह्यात जास्त ताकद आहे. त्यामुळे मतभेद आहेत, हे मात्र खरं आहे. त्यावर चर्चा झाली. भाजप शिरूर बारामतीमध्ये कोणीही आले तर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार निवडून येईल. बाहेरचा कोणीही आला तरी लोक इथं राष्ट्रवादीलाच ताकद देतील," असे भरणे यांनी सांगितले.
"राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावरून लक्ष हटवण्यासाठी विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका होत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना आम्ही स्वराज्यरक्षकच म्हणणार,ज्यांना कोणी काय म्हणायच ते म्हणा," असे भरणे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.