AJit Pawar, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar And Eknath Shinde: अजित पवारांची 'विकासाची साथ' शिंदेंना राजकीय फायद्याची ठरणार की तोट्याची ?

Ajit Pawar Join State Government: भाजपचा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा डाव

महेश जगताप

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी (ता. २) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही विकासाला सोबत घेतले असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र वर्षापूर्वी असाच राजकीय भूकंप करतांना शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले होते.

यावेळी अजित पवार यांच्यावरही असमान निधी वाटल्याचा आरोप केला होता. आता वर्षानंतर शिंदे यांनी कोलांटीउडी घेतना पवार यांना 'विकासाची साथ' म्हणत सत्तेत सामावून घेतले. यावर शिंदे यांना ही विकासाची साथ राजकीय फायद्यात ठेवणार की तोट्यात घेऊन जाणार, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चां सुरू झाली आहे. (Latest Political News)

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रविवारी (दि. २) मोठा राजकीय भूकंप घडला आहे. पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाल्यानंतर सुमारे ३५ हून अधिक आमदारांसह अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिल्याची माहिती आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

पवार यांच्यावर टीका करुन महाविकास आघाडीमधून तत्कालीन शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केले होते. त्यांना ५० आमदारांनी साथ दिली होती. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत सत्तांतर केले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षातच पवार यांनाही उपुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे व विद्यमान शिवसेनेचे मंत्र्यांची गोची झाली आहे.

शिवसेनेचे काही नेत्यांनी व मंत्र्यांनी पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत आली तर आम्ही सत्तेत्तून बाहेर अशी जाहीर वक्तव्ये केली होती. त्यामुळे आपण व इतर सहकाऱ्यांनी मांडलेल्या भूमिकेचं काय? असा प्रश्न शिंदे यांना पडला आहे.

मुख्यमंत्री शिंदेंना आता 'असा' तोटा होऊ शकतो

  • लोकसभेला शिंदे यांच्यापेक्षा पवार यांची भाजपला अधिक मदत होणार आहे. याची राज्यातील व केंद्रातील नेत्यांना जाणीव झाली. त्यामुळे आता सरकारमध्ये पवारांचे महत्व वाढणार आहे.

  • शिंदे यांना पवार यांच्या रूपाने तगडा प्रतिस्पर्धी तयार होणार असल्याची चर्चा आहे.

  • शिंदे यांना स्व पक्षातील अनेक मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांची नाराजी दूर करणे कठीण जाणार आहे.

  • अजित पवार यांना भाजप ताकद देऊन शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या शपथ घेतलेल्या मंत्र्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. यामुळे शिंदे यांची कोंडी होण्याचा शक्यता आहे.

  • भाजपकडून शिंदेंना 'तुम्ही नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस' असा थेट इशारा दिल्याचे बोलले जात आहे.

  • लोकसभा आणि विधानसभेत जागावाटपात शिंदे यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Edited by Sunil Dhumal

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT