NCP Crisis News : Ajit Pawar : Amol Kolhe  Sarkarnama
मुंबई

NCP Crisis News : फसवून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले; अशोक पवार अन् कोल्हेंचा अजित पवारांवर आरोप!

NCP Crisis News : "अजित पवारांकडून आमची दिशाभूल केली गेली.."

Chetan Zadpe

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पाच विद्यमान आमदार आणि एका खासदाराने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडे प्रतिज्ञापत्र दिले असल्याची माहिती समोर आली होती. यात शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांचे दोन्ही गटाकडे प्रतिज्ञापत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र दिशाभूल करुन आपल्याकडून प्रतिज्ञापत्र घेतल्याचा कोल्हे यांनी सांगितले आहे. यामुळे आता हे पाच आमदार आणि खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात अधिकृतपणे आहेत याबाबत संधिग्धता निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिज्ञापत्राबाबत आपली दिशाभूल केल्याचे म्हणत, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर आरोप केला आहे. तर याबाबत आमदार अशोक पवारांनीही आपल्याला फसवून प्रतिज्ञापत्र घेतल्याबाबत आरोप केला आहे. यामुळे अजित पवार गट याबाबत काय खुलासा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीच्या दोन्ही बाजूला प्रतिज्ञापत्र देणाऱ्या राष्ट्रवादीचे पाच आमदार आणि एका खासदाराचे नाव समोर आले आहे. यामध्ये आमदार चेतन तुपे, किरण लहामटे, राजेंद्र शिंगणे, मानसिंग नाईक आणि अशोक पवार यांनी प्रतिज्ञापत्र अजित पवार आणि शरद पवार या गटाकडे सुपूर्द केले आहे.

शरद पवारांना पाठिंबा -

आमदार अशोक पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांचे सुरुवातीला अजित पवार यांचा गटाला प्रतिज्ञापत्र होते. मात्र त्यांनतर त्यांनी पुन्हा शरद पवार गटाला आपले समर्थन दिले आहे. याबाबत काउंटर प्रतिज्ञापत्र दाखल करन आमची दिशाभूल करून अजित पवार गटाने प्रतिज्ञापत्र घेतल्याचा आरोप अशोक पवार आणि अमोल कोल्हे यांनी आरोप केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT