Sharad Pawar Vs Ajit Pawar : दिल्लीचे तख्त राखण्याासठी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि सत्ता हिसकावण्याची रणनीती आखलेल्या विरोधकांमध्ये बैठकांचा सपाटा सुरू झाला असून त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटही या बैठकांकडे वळले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरोधकांसाठी दक्षिणेत अर्थात बेंगळूरुत तर उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपला साथ देण्यासाठी राजधानी दिल्लीत म्हणजेच उत्तरेत दाखल होणार आहेत. केंद्रातील सत्तेसाठी मोर्चेबांधणीच्या स्पर्धेतून राष्ट्रवादीत दक्षिण-उत्तरायणाचा प्रयोग पाहायला मिळणार आहे. (Latest Political News)
लोकसभेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी 'एनडीए' आणि भाजपविरोधकांनी जोरदार तयारी चालवली आहे. या निवडणुकीला जेमतेम नऊ-दहा महिन्यांचा अवधी राहिल्याने प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून बळ वाढवण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधक करत आहेत.
या निवडणुका जिंकण्यासाठी प्रादेशिक पक्षांना आपल्याकडे खेचून शक्तीप्रदर्शनातूनही दोन्ही एकमेकांना आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळीची भर पडून नवे राजकारण घडत आहेत.
विरोधकांचे नेतृत्व करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या शरद पवार हे काँग्रेसच्या बैठकीला बेंगळूरुत दाखल झाले आहेत. तर दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार राजधानीकडे रवाना होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा जुळवाजुळवीची शक्यता असतानाच एनडीए आणि विरोधकांमधील बैठक सत्रांमध्ये सहभागी होऊन शरद पवार आणि अजित पवार गट समोरासमोर आले आहेत. दुसरीकडे दिल्ली आणि बेंगळूरुतील बैठकीसाठी साथ देणाऱ्या घटक पक्षांचे आकडे मांडले जात असले तरी प्रत्यक्षात हे आकडे कुणाचे पारडे जड करणार याचा फैसला मंगळवारी दुपारनंतर स्पष्ट होईल.
दरम्यान, विरोधकांच्या बैठकीतील पहिल्या दिवशी शरद पवार अनुपस्थित होते. त्यानंतर मात्र मंगळवारी बंगळुरूत सकाळीच दाखल झाले आहेत. तर अजित पवार दिल्लीतील 'एनडीए'च्या बैठकीला हजेरी लावणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दक्षिण-उत्तरायण सुरू झाल्याचे आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.