MLA Disqualification News : विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला शिवसेना ठाकरे गटाचा ठेंगा; उत्तर ने दण्याची भूमिका..

Shivsena MLA Disqualification News : "१६ आमदार अपात्र आहेत, त्यांनीच या नोटीशीला उत्तर देणं अपेक्षित आहे."
Shivsena MLA Disqualification News
Shivsena MLA Disqualification News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी बजावलेल्या नोटीशीला शिवसेनेने (ठाकरे गट) उत्तर न देण्याची भूमिका घेतली आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर, विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस बजावली होती, याबाबत १४ दिवसात उत्तर देण्यास सांगितलं होते, मात्र मुदत संपून सुद्धा ठाकरे गटाच्या आमदारांनी उत्तर दिलेलं नाही. (Latest Marathi News)

Shivsena MLA Disqualification News
Solapur Politic's : उद्धव ठाकरे अन्‌ काँग्रेससोबत अजितदादांना जायचंच नव्हतं; शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांकडून उत्तर सादर करण्यात आलेलं आहे. मात्र नोटीशीला उत्तर न देण्याची भूमिका ठाकरे गटानची आहे. "आम्ही या संदर्भात याचिका दाखल केली होती, अपात्रतासंदर्भात आम्ही पत्र दिलं होतं. त्यामुळे जे १६ आमदार अपात्र आहेत, त्यांच्या संदर्भात कारवाई करावी. त्यांनीच या नोटीशीला उत्तर देणं अपेक्षित आहे. त्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही उत्तर न देण्याची भूमिका हा निर्णय घेतला आहे," असे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे .

विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस -

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या सर्व 40 आमदारांना नोटीस पाठवली होती. ठाकरे गटाच्याही 14 आमदारांना देखील विधीमंडळाची नोटीस पाठवण्यात आली होती. दोन्ही गटाच्या आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांची वेळ देण्यात आला आहे.

Shivsena MLA Disqualification News
Shiv Sena MLA Disqualification: : विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना नोटीस

सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेबाबतचा हा निर्णय प्रलंबित होता. वर्षभराच्या न्यायालयीन लढाईनंतर ११ मे रोजी याबाबत निकाल देत न्यायालयाने याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असा निर्णय दिला होता. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यायला सांगा, या आशयाची याचिका सुनील प्रभूंकडून दाखल करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Uddhav Thackeray
Uddhav thackeray, ambadas danve
Ahilyanagar Voter List
Harshvardhan Sapkal-Sharad Pawar-Uddhav Thackeray
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com