Ajit Pawar On Sharad Pawar : राज्यात रविवारी (ता. २) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांनी इतर आठ जणांसह राज्य सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले. मात्र कुठल्या गटात किती आमदार हे मात्र अस्पष्ट होते. त्याबाबत आज बुधवारी (ता. ५) दोन्ही गटांच्या मुंबईत बैठका पार पडल्या. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का फूट पडली, याबाबत सविस्तर माहिती दिली. (Latest Political News)
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आतापर्यंत संपूर्ण प्रवास मांडला. यावेळी त्यांनी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलेली मुख्यमंत्री पदाची संधी दवडल्याची खंत व्यक्त केली. अजितदादा म्हणाले, १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यावेळी पक्षाला ५८ जागा मिळाल्या. त्यानंतर २००४ मध्ये पक्षाला ७८ जागा मिळाल्या. त्यावेळी सोनिया गांधी यांनी विलासराव देशमुख यांना फोन करून राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद देण्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी देशमुख यांनीही पवार यांना कुणाला मुख्यमंत्री करणार अशी विचारणा झाली. मात्र आपण ती संधी दवडली."
२००४ ची संधी दवडली नसती तर आजपर्यंत आपलाच मुख्यमंत्री असता, असेही अजितदादांनी स्पष्टच सांगितले. ते म्हणाले, "२००४ ला चार मंत्रिपदे जास्त घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पदावर पाणी सोडले. याचा परिणाम म्हणजे पुढच्या काळात पक्षाची ताकद कमी होत गेली. जर आपला मुख्यमंत्री झाला असता तर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री असता. राष्ट्रीय पक्ष आता राज्याचा झाला. तरीही कुठलेही ठोस निर्णय घेतले जात नाहीत."
यावेळी अजितदादांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबाबत सहानुभूती व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, पक्ष स्थापनेपासून छगन भुजबळ यांनी राज्य पिंजून राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यास मदत केली. १९९९, २००४ मध्ये भुजबळ यांनी पक्षासाठी मोठी कामगिरी केली. मात्र संधी असतानाही २००४ मध्ये मुख्यमंत्री पद घेतले नाही. यानंतर सतत काँग्रेसचा मुख्यमंत्री होत गेले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.