Maharashtra Political Crisis Live: अजित दादांनी अनेक अपमान सहन केले ; सुनील तटकरेंनी सांगितली आपबिती

Ajit Pawar Calls Meeting : तर महाराष्ट्राला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री तेव्हाच मिळाला असता.
Sunil Tatkare
Sunil TatkareSarkarnama
Published on: 
Updated on: 

Latest News On NCP Meeting : राजकारणात असे काही कालखंड येत असतात, तेव्हा असे निर्णय घ्यावे लागतात आणि अजित दादांनी इतका मोठा निर्णय घेण्याची तत्परत दाखवली. धनंजय मुंडे यांनी सांगितलेली परिस्थिती खरी आहे. या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. अजित दादांनी अनेक अपमान सहन करुन राज्यात पक्ष संघटना वाढवण्याचं काम केलं. (Maharashtra Politics)

२००४ मध्ये आम्हाला सर्वाधिक मताधिक्य मिळालं. साहेबांनी आम्हाला आदेश दिले, काहींनी काम केलं, काहींनी नाही केलं. काहींनी आपल्या मतदार संघापूरतंच काम केलं, सर्वांनी जर त्याच ताकदीने काम केलं असतं तर महाराष्ट्राला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री तेव्हाच मिळाला असता.

Sunil Tatkare
Rashtrawadi Lok Sabha MPs: राष्ट्रवादीचे खासदार कुणाकडे? तटकरे अन् पटेल अजितदादाकडे तर शरद पवारांकडे...

अजित दादांनी बेधडक काम केली. विरोधकांनीही अंगावर घेतंल. आम्हाला वाटलं अजित दादा विरोधकांना एवढ का अंगावर घेत आहेत पण अजित दादा म्हणायचे की, जर मी राज्याच्या सर्वोच्च ठिकाणी असेल तर ज्यांच्यामुळे मी इथे आहे, त्यांना ताकद मिळाली पाहिजे.

राज्यात अस्थितरता असेल तर काही निर्णय घ्यावे लागतात, अजित दादांनी ती भूमिका घेतली. राज्यातील ७०-७५ टक्के पदाधिकांऱ्यांचा पाठिंबा आहे. अजित पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले पण त्याचं सर्व खापर त्यांच्यावरच फोडण्यात आलें, सर्व दोष तुमच्या माथ्यावर मारण्यात आला. २०१९ ला आपण शिवसेनेसोबत गेलो, वेगवेगळ्या राज्यातील परिस्थिती कशी आहे ते आपण पाहत आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.