Ajit Pawar NCP 
मुंबई

Nawab Malik: "नवाब मलिकांच्या पक्षाशी आमचा संबंध नाही" म्हणणाऱ्या भाजपला राष्ट्रवादीनं झडकारलं! मलिकांच्या कुटुंबातून ३ जणांना दिली उमेदवारी

Nawab Malik Family members in election: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप-शिवसेना एकत्र लढणार आहेत. तर राष्ट्रवादीला जाणिवपूर्वक भाजपनं दूर ठेवलं आहे.

Amit Ujagare

Nawab Malik: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप-शिवसेना एकत्र लढणार आहेत. तर राष्ट्रवादीला जाणिवपूर्वक भाजपनं दूर ठेवलं आहे. नवाब मलिकांच्या पक्षाशी आमचा संबंध नाही, असं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलं होतं. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसनंच भाजपच्या भूमिकेला केराची टोपली दाखवली आहे. कारण मलिकांच्या कुटुंबातील ३ जणांना राष्ट्रवादीनं उमेदवारी जाहीर केली. मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजप-शिवसेनेशिवाय लढत आहे.

मलिकांचे कुटुंबिय निवडणुकीच्या रिंगणात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मलिक कुटुंबातून यंदा ३ जण निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक प्रभाग क्रमांक १६५, नवाब मलिक यांची बहीण डॉ. सईदा खान प्रभाग क्रमांक १६८ तर कप्तान मलिक यांची सून बुशरा नदीम मलिक प्रभाग क्रमांक १७० मधून निवडणूक लढणार आहेत. कप्तान मलिक यांचा जुना प्रभाग १६८ सध्या महिलांसाठी राखीव झाल्यानं कप्तान मलिक यांच्याकडून आपल्या सुनेला या प्रभागात निवडणूक उतरवण्याचा निर्णय घेतला. तर स्वतः साठी नवीन प्रभाग १६५ मधून लढण्याचा निर्णय कप्तान मलिक यांनी घेतला आहे.

मलिकांची अजितदादांना साथ

दरम्यान, नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते आहेत. सध्या ईडीच्या चौकशीमुळं न्यायालयीन कोठडीत जावं लागलेले नवाब मलिक सध्या वैद्यकीय कारणास्तव जामिनावर आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं, तेव्हापासून ते पक्षात अजूनही कार्यरत आहेत. ज्या भाजपनं नवाब मलिकांना तुरुंगात पाठवलं त्याच भाजपसोबत राज्यात सत्तेत असतानाही अजित पवारांनी मुंबई महापालिकेची जबाबदारी नवाब मलिकांच्या खाद्यावर सोपवली आहे. याद्वारे त्यांनी आपल्या जुन्या ज्येष्ठ नेत्यावर विश्वास दाखवला आहे. इतकंच नव्हे तर आता त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना उमेदवाऱ्या देखील जाहीर केल्या आहेत.

भाजपला नवाब मलिकांना विरोध

मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेत युती झाली, जागा वाटपही जवळपास पूर्ण झालं आहे. याचीच माहिती देण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली होती. याच पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अमित साटम यांना विचारलं की, "महायुतीतील घटकपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत का घेतलं नाही?" त्यावर उत्तर देताना साटम यांनी म्हटलं होतं की, "आमची भूमिका आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमचं काही देणघेणं नाही.

नवाब मलिक यांच्यावरती गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही. मुंबईसाठी राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक आहेत, राष्ट्रवादीनं मलिक यांच्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी दिली असल्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर युती करु इच्छित नाही. उद्या राष्ट्रवादीनं आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून दुसऱ्या कोणा नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT