

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. प्रत्येक जागासाठी कोणता उमेदवार ठरतो या निकषानुसारच जागावाटप करण्यात येत आहे. त्यामुळे महायुती व ठाकरे बंधूंच्या युतीचे जागावाटप लांबत चालले आहे. शनिवारी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास फायनल झाला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरेंच्या मनसेच्या सोबत येत्या काळात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस राहणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत बाजी काळ मारणार याकडे लक्ष लागले आहे. त्याशिवाय काँग्रेस स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार आहे तर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी गेल्या वर्षभरापासून भाजपकडून (BJP) केली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेची सत्ता मिळवायची तयारी भाजपने केली आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महहपलिकेवर एकसंध शिवसेनेची सत्ता आहे. या सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपने मोठे प्लॅनिंग केले आहे. त्यासाठीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत त्यांनी महायुती केली आहे. त्यामुळेच महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेतील (Shivsena) जागावाटप जवळपास फायनल झाले असून त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. या ठरलेल्या जागावाटपात किरकोळ बदल सोडले तर त्यावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. त्यामुळे शिवसेना नेते राहुल शेवाळे व भाजपचे आमदार अमित साटम यांनी केलेल्या या जागावाटप फायनल केले कार आहे. त्यानुसार भाजपला १४० तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जवळपास ८७ जागा आल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात महायुतीविरुद्ध ठाकरे बंधू अशी लढत रंगणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
त्यातच आता दोन दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरेंची मनसेसोबत येणार आहे. त्याची अधिकृत घोषणा दोन बंधूनी ऐकत येत केली आहे. तर दुसरीकडे त्यांच्यासोबत येण्याची तयारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळेच माजी मंत्री जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्यानुसार आता राष्ट्रवादी काँग्रेसला काही जागा सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे येत्या काळात ठाकरे बंधूंच्या युतीला राष्ट्रवादीच्या माध्यमातून पॉवर मिळणार आहे.
येत्या काळात मुंबईत मराठी मतांचे विभाजन टाळणे, हे महाविकास आघाडीसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. अशातच, शरद पवार यांनी पुढाकार घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात किमान मुद्द्यांवर सहमती घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेनेची ताकद आणि राज ठाकरेंची आक्रमक शैली एकत्र आल्यास महायुतीला मोठा फटका बसू शकतो. मुंबईत 'ठाकरे' हे नाव आजही मतदारांना आकर्षित करते. त्यामुळे ठाकरे बंधूंना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एका बाजूला उभे करणे, ही शरद पवारांची रणनीती असल्याचे दिसते.
येत्या काळात ठाकरे बंधू शरद पवारांच्या सोबतीने मैदानात उतरले, तर मुंबईतील लढाई ही 'मराठी अस्मिता' विरुद्ध 'महायुतीचा विकास' अशी होणार आहे. या निवडणुकीत मनसेमुळे होणारे मतविभाजन थांबल्यास त्याचा थेट फायदा ठाकरेंच्या शिवसेनेला व महाविकास आघाडीला होऊ शकतो. शरद पवारांची रणनीती केवळ मराठी मतांपुरती मर्यादित नसून, मुस्लीम आणि दलित मतांची जोड देऊन विजयाचे समीकरण जुळवण्याकडे त्यांचा कल आहे.
दुसरीकडे महायुतीने जरी फॉर्म्युला ठरवला असला, तरी ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची चर्चा त्यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण करणारी आहे. शिंदे गटाच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, कारण मुंबईतील शिवसैनिक कुणाच्या बाजूने उभा राहतो, यावरच शिवसेनेच्या भविष्यातील वारसदार ठरणार आहे.
मुंबई महानगरपालिकेची ही लढाई केवळ सत्तेची नसून ती अस्तित्वाची आहे. एका बाजूला महायुतीची संघटनात्मक ताकद आणि सत्तेचा जोर आहे, तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांचा अनुभव आणि ठाकरे नावाचे वलय आहे. त्यामुळे 'मुंबई कुणाची?' या प्रश्नाचे उत्तर या नव्या समीकरणांच्या निकालावरच अवलंबून असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.