Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

NCP News : अजित पवार गटाच्या वरिष्ठांकडून नेत्यांना मीडियासमोर अधिक न बोलण्याची ताकीद?

NCP Ajit Pawar Group : राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी सुरु आहे.

Jui Jadhav

NCP Hearing : शिवसेना कुणाची याची उत्सुकता जशी होती, तशीच उत्सुकता आता राष्ट्रवादी कुणाची याची लागली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी सुरु आहे. मात्र या दरम्यान संबंधित कोणत्याही नेत्याने माध्यमांशी संपर्क साधू नये, अशी ताकीद अजित पवार गटातील वरिष्ठांकडून देण्यात आल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाी सोमवारी दोन्ही गटातील आमदारांची उलट तपासणी पूर्ण झाली आहे. मंगळवारपासून वकिलांमध्ये युक्तिवाद सुरु होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याला आता प्रतीक्षा आहे ती राष्ट्रवादी कोणाची? याबाबत राहुल नार्वेकरांच्या(RAHUL NARWEKAR) निकालाची. मात्र तत्पूर्वी या सुनावणी दरम्यान अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांनी संबंधित नेत्यांना माध्यमांशी संवाद साधू नये, असे बजावल्याची माहिती समोर आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार(Ajit Pawar) गटातील ठराविक आमदार किंवा नेतेच माध्यमांशी संवाद साधतात. मात्र काही जण अद्यापही माध्यमांपासून अलिप्त आहेत. सोमवारी मंत्री अनिल पाटील यांची उलट तपासणी संपल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधण्यास नकार दिला. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी तसं सांगितलं आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. तसेच विषय एक असतो आणि उत्तराचा भलताच अर्थ काढला जातो, अशीदेखील यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केल. त्यामुळे नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधू नये अशी एकप्रकारे तंबीच देण्यात आल्याचे दिसत आहे.

एखाद्या पक्षाची भक्कम बाजू माध्यमांसामोर मांडण्यासाठी प्रवक्त्याची निवड केली जाते. प्रवक्ता हा माध्यमांसमोर पक्षाची भूमिका आणि इतरही राजकीय घडामोडींवर भाष्य करणारा असतो. राष्ट्रवादीमध्ये फूट दोन गट पडले, तेव्हा अजित पवार गटाकडून पक्षाचे प्रवक्तेही निवडले गेले. यानंतर दोन्ही गटांमधील नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपही झाले.

शरद पवार यांच्या गटाकडून टीका सुरु असताना अजित पवार गटाने देखील प्रत्युत्तर दिल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांची काही दिवसांपूर्वी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी प्रवक्त्यांना सक्त ताकीत दिली की, जर शरद पवार गटाकडून टीका केली गेली तर जशास तसे उत्तर द्यायचं. मात्र या सगळ्यांमध्ये कोणीही माध्यमांसमोर जाऊन अधिक बोलू नये, केवळ प्रवक्त्यांनीच बोलावं असे देखील त्यांनी स्पष्ट केलं. म्हणूनच अजित पवार गटातील नेते आता माध्यमांसमोर अधिक भाष्य करताना दिसत नाहीत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT