NCP Hearing : राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? 15 फेब्रुवारीपर्यंत लागणार निकाल; नार्वेकरांची माहिती

Rahul Narwekar information : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात उद्या आणि परवा अशी दोन दिवस सुनावणी होईल.
Sharad Pawar-Ajit Pawar
Sharad Pawar-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत देण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, त्यानुसार येत्या १५ फेब्रुवारीच्या आतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमदार अपात्रता प्रकरणाचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली. (Whose NCP Party? Result due by February 15; Rahul Narwekar)

पक्षांतर बंदी कायदा (शेड्यूल १०) चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी ॲड राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नार्वेकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याचिकेसंदर्भात आज सुनावणी झाली. दोन्ही बाजूचे पुरावे आज सादर झाले आहेत. या प्रकरणी उद्या आणि परवा अशी दोन दिवस सुनावणी होईल. येत्या ३१ जानेवारीपर्यंत हा मॅटर ‘क्लोज टू ऑर्डर’ होईल. (NCP's Hearing)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar-Ajit Pawar
Lalit Patil Drugs Case : आमदार धंगेकरांचा मुश्रीफांवर गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

दरम्यान, विधीमंडळ सचिवालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल १५ फेब्रुवारीपर्यंत देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार येत्या १५ फेब्रुवारीच्या आतमध्ये या प्रकरणाचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar-Ajit Pawar
Indapur Politics : जानकरांच्या गळाला कोण लागणार?; प्रवीण मानेंपाठोपाठ आप्पासाहेब जगदाळेंनाही ऑफर!

शिवसेनेसंदर्भात मी दिलेल्या निर्णयात कायदेशीरदृष्ट्या काय चुकीचे आहे, हे दाखवून देण्याची धमक ना जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये आहे, ना उद्वव ठाकरे दाखवू शकले आहेत. खासदार संजय राऊत यांचा तर विषयच उद्‌भवत नाही, असा टोलाही नार्वेकर यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांचे माझ्यावर विशेष प्रेम

ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. त्यावर मी जास्त बोलणार नाही. मात्र, संपूर्ण देशातून महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांना पक्षांतर बंदी कायदा (शेड्यूल १०) चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी संधी मिळते, ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याबद्दल ठाकरेंनी माझे अभिनंदन करायला हवे होते. मात्र, राज्याच्या अस्मितेबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा वेगळा अंदाज आहे. पण त्यांनी ज्या शुभेच्छा मला दिल्या, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.

Sharad Pawar-Ajit Pawar
NCP MLA Disqualification Hearing : अजितदादा गटाची शरद पवारांना शह देण्याची खेळी; सुनावणीवेळी काय घडलं पाहा...

ओम बिर्ला यांचे आभार

पक्षांतर बंदी कायदा (शेड्यूल १०) चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचे आभार मानतो. घटनेच्या दहाव्या परिशिष्टासंदर्भात सुधारणा करण्याची गरज आहे, त्याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून ते काम करण्यात येईल आणि दहाव्या परिशिष्ठाला अधिक मजबूत करण्यात येईल, असेही नार्वेकर यांनी नमूद केले.

Sharad Pawar-Ajit Pawar
Solapur NCP : वडील पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष; तर मुलगा अजितदादांच्या पक्षाचा तालुकाध्यक्ष!

राजकीय पक्षाकडून यापुढे तरी कार्यवाही होईल

ते म्हणाले, अनेक राजकीय पक्ष नियमांतील तरतुदीकडे दुर्लक्ष करतात. त्याचं महत्व आता असा प्रसंग घडल्यानंतर लोकांना पटायला लागले आहे. एखादा राजकीय पक्ष आणि संघटना चालवताना यासंदर्भातील कायदेशीर तरतुदीची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ती गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. त्यामुळे राजकीय पक्षाकडून अशी कार्यवाही यापुढे तरी होईल, अशी अपेक्षा आहे.

Sharad Pawar-Ajit Pawar
OBC Melava : सग्यासोयऱ्यांच्या अधिसूचनेनंतर आक्रमक भुजबळ नगरमधून फुंकणार संघर्षाचे रणशिंग!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com