NCP MLA Disqualification Hearing : अजितदादा गटाची शरद पवारांना शह देण्याची खेळी; सुनावणीवेळी काय घडलं पाहा...

NCP Crisis : राज्य प्रतिनिधींनी मला २०१५ मध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडून दिले होते. मात्र, त्यानंतर पक्षात निवडणुकाच झाल्या नसल्याचा दावा खासदार सुनील तटकरे यांनी केला.
Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad PawarSarkarnama

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र सुनावणीची सलग सुनावणी सुरु आहे. गेल्या सुनावणीपासून अजित पवार गटाचे नेत्यांची उलटतपासणी सुरु झाली आहे. त्यावेळी स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. मात्र, आज अजित पवार गटातील नेते उपस्थित पाहायला मिळाले. त्याद्वारे अजित पवार गटाने शरद पवार गटाला शह देण्याची खेळी खेळल्याचे मानले जात आहे. (Presence of Ajit Pawar group leaders at NCP hearing)

राष्ट्रवादी कोणाची आणि राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची उलटतपासणी पार पडली. या उलटतपासणीसाठी स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार उपस्थित होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar Kolhapur Tour : ‘मी, मुख्यमंत्री अन्‌ फडणवीस एकत्र बसून भुजबळांशी बोलणार’; भुजबळ तिघांचा सल्ला ऐकणार का?

अजित पवार गटातील नेत्यांवर दबाव आणण्यासाठी स्वतः पवार उपस्थित होते, असं सर्वांना वाटलं. अजित पवार गटाचे नेते नेमकं आपल्याबद्दल काय बोलत आहेत किंवा त्यांची काय भूमिका आहे, हे जाणून घेण्यासाठी स्वतः शरद पवार उपस्थित होते. सुनावणीदरम्यान मध्यंतर झाल्यावर ते निघून गेले. मात्र, सुनील तटकरे यांच्यावर प्रेशर दिसून आलं.

अजित पवार गटाचे नेते उपस्थित

अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांची आज उलटतपासणीच्या वेळी अजित पवार गटातील नेतेही सुनावणीसाठी उपस्थित होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ, प्रवक्ते सूरज चव्हाण आणि इतरही नेते उपस्थित होते. शरद पवार गटातर्फे जशी पवारांची उपस्थिती होती. तसंच काहीसं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न अजित पवार गटातील नेत्यांनी केला. त्यांची सुनावणी पूर्ण होईपर्यंत ते तिथे बसून होते.

Ajit Pawar-Sharad Pawar
Solapur NCP : वडील पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष; तर मुलगा अजितदादांच्या पक्षाचा तालुकाध्यक्ष!

अजितदादांच्या ‘त्या’ शपथविधीला पक्षनेतृत्वाचा पाठिंबा

अजित पवार यांनी २०१९ मध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची युती होती का, या शपथविधीला पक्षनेतृत्व आणि इतर पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा होता का, असा प्रश्न तटकरे यांना केला असता या शपथविधीला पक्षनेतृत्वाचा पाठिंबा होता, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांना शपथविधीसाठी कशी मान्यता देण्यात आली, यावर मात्र तटकरे यांनी सांगता येणार नाही, असे उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीवेळी शरद पवार हे उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे, रोहित पवार हेही उपस्थित होते.

Ajit Pawar-Sharad Pawar
OBC Melava : सग्यासोयऱ्यांच्या अधिसूचनेनंतर आक्रमक भुजबळ नगरमधून फुंकणार संघर्षाचे रणशिंग!

‘...त्यानंतर राष्ट्रवादीत निवडणुका झाल्या नाहीत’

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही अथवा गटही नाही. एकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. राज्य प्रतिनिधींनी मला २०१५ मध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडून दिले होते. मात्र, त्यानंतर पक्षात निवडणुकाच झाल्या नसल्याचा दावा खासदार सुनील तटकरे यांनी केला. अजित पवार यांनी २०१९ मध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास पक्षनेतृत्वाचा पाठिंबा होता, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar-Sharad Pawar
Nanded Lok Sabha: काँग्रेसचं ठरलं माजी मुख्यमंत्री हेच लोकसभेचे उमेदवारॽ कार्यकर्ते कामाला लागले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com