Thane : माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात बॉम्ब ठेवला आहे, असा निनावी फोन आला आणि एकच खळबळ उडाली. शनिवारी (ता.3) रात्री आलेल्या या फोनने ठाणे शहर पोलिस यंत्रणाच कामाला लागली. ठाणे शहर पोलिस दलातील बॉम्ब शोधक पथकाने त्या बंगल्यावर धाव घेत शोध मोहीम सुरू केली. मात्र हाती काही लागले नाही. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता वर्तवली होती. (Jitendra Awhad News )
आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या ठाण्यातील 'नाद ' या बंगल्यात शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बॉम्ब असल्याचा एका निनावी फोन आला. त्या फोननंतर तातडीने ठाणे शहर पोलिस दलातील बॉम्ब शोधक पथकाने धाव घेत बंगला आणि आजूबाजूच्या परिसराची कसून तपासणी केली. पण, कुठे ही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून न आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजप आमदाराने शिवसेना शिंदे गटाच्या कल्याण शहर प्रमुखावर गोळीबार केल्याची घटना ताजी आहे. त्यातच आव्हाडांच्या बंगल्यात बॉम्ब ठेवल्याच्या या निनावी फोनने पुन्हा शहर पोलिसांची धावपळ उडाली होती. जानेवारी महिन्यात शिर्डी येथे आमदार आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विशेष अधिवेशनात प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असे वादग्रस्त विधान केले होते.
जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप केला होता. ते मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर हाॅटेल बाहेर पत्रकारांशी संवाद साधत असताना पत्रकारांच्या मागे उभे राहिलेले तीन इसम मला मारण्यासंदर्भात चर्चा करत होते. पत्रकरांनी ही गोष्टी पोलिसांच्या लक्ष्यात आणून दिली.मात्र, ते पळून जाण्यात यशस्वी झाले.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.