Ajit Pawar Vs Jitendra Awhad : अजितदादांच्या 'या' नेत्याने वाढवलं जितेंद्र आव्हाडांचं टेन्शन

Mumbra-kalwa Election: अजित पवार गटातील 'या' नेत्याने थेट आमदार जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिले
Jitendra Awhad and Ajit Pawar
Jitendra Awhad and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

पंकज रोडेकर :

Thane News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले नजीब मुल्ला यांनी शनिवारी वाढदिवसाचा 'एन'अक्षराचा केक कापला. त्या केकवर आमदार कळवा-मुंब्रा विधानसभा असा उल्लेख असल्याने अजितदादांच्या या नेत्याने थेट आमदार जितेंद्र आव्हाडांनाच आव्हान दिले आहे. शिंदे गटाकडून नजीब मुल्ला यांना 'डॅशिंग दमदार, भावी आमदार' अशा शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कळवा-मुंब्रा मतदारसंघात आव्हाड विरुद्ध मुल्ला अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे.

अजित पवार यांचे नजीब मुल्ला हे जरी कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात असले तरी, आमदार आव्हाड हेच मुल्लांचे ठाण्यातील बॉस होते. मात्र काही कारणास्तव त्या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यावेळी मुल्ला हे ठाण्यातून पहिले अजित पवारांसोबत गेले. या फुटीनंतर मुल्लांनी कळवा-मुंब्रा मतदारसंघात आव्हाडांना पुरेपूर घेरण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jitendra Awhad and Ajit Pawar
Ajit Pawar : 'कोणी कितीही मोठा असो, कितीही मोठ्या बापाचा असो त्याला...' ; अजित पवारांचा इशारा!

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी हातातील घड्याळ उतरवून मुल्लांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. अशा प्रकारे आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात अजित पवार गटाला यश आले. आता मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी आणलेल्या केकवर आमदार असा उल्लेख करण्यात आला होता. पण आमदार कळवा-मुंब्रा विधानसभा असे असल्याने कार्यकर्त्यांमार्फत मुल्ला यांनी थेट आव्हाडांना आव्हानच दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी आपल्या वाढदिवसाच्या कापलेल्या केकवर 'भावी आमदार' म्हटले होते. तो केकही त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणला होता. त्यामुळे ते देखील आमदारकीच्या शर्यतीत असल्याची चर्चा रंगली. मात्र नजीब मुल्ला यांनी गतवर्षीची कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आव्हाड यांच्या सांगण्यावरून लढवली होती. त्यातच आता मुल्ला आणि आव्हाड कळवा-मुंब्रा मतदारसंघात आमने-सामने येतात का ? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

(Edited By : Ganesh Thombare)

Jitendra Awhad and Ajit Pawar
Maratha Aarakshan Mumbai Morcha : ... अन् मनोज जरांगेंच्या मायभूमीत पुन्हा एकदा दिवाळी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com