Ganpat Gaikwad Firing : गोळीबारातील जखमी शाखाप्रमुख गायकवाडची पालकमंत्री देसाई करणार विचारपूस..!

Shinde Group Shivsena Vs BJP : शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये वाद उफळण्याची शक्यता ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन केली होती चौकशी.
Shambhuraj Desai
Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

Thane News : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या दोघांची रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्यानंतर आज रविवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई हे ज्युपिटर रुग्णालयात येणार आहेत.

साधारण दुपारी दोन वाजता ते रुग्णालयात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकारावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये वाद उफळण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. पोलिस ठाण्यातच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या असून त्यांचे साथीदार राहुल पाटील यांना दोन गोळ्या लागल्या. त्या दोघांना तातडीने ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले होते.

Shambhuraj Desai
Baramati Loksabha : शेवटची निवडणूक म्हणतील...भावनिक करतील; पण मी उभा केलेल्या उमेदवारालाच निवडून द्या; अजित पवार

गायकवाड यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तर राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर असून त्यांनाही अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. घटनेनंतर शनिवारी दिवसभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची चौकशी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, रुग्णालयात माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के आणि कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आदी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना, झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे, अशी भावना व्यक्त केली.

तर खासदार डॉ. शिंदे यांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. त्यानुसार पोलीस आरोपींवर कडक कारवाई करतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान पालकमंत्री देसाई हे रविवारी दुपारी रुग्णालयात येऊन जखमी गायकवाड यांची चौकशी करणार आहेत. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

(Edited by Amol Sutar)

Shambhuraj Desai
Manoj Jarange : "राजीनामा द्या किंवा डोक्यावर घेऊन फिरा, पण...", मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com