Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : अजित पवारांना सर्वोच्च न्यायालायाचा मोठा दिलासा

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. इन्कम टॅक्सने तात्पुरत्या स्वरूपात जप्त केलेल्या मालमत्तेवरची जप्ती हटवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानंतर मुंबई इन्कम टॅक्सने ही जप्ती हटवली आहे.

गुरू कॉमोडीटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून खरेदी केलेल्या मालमत्तेवरचे जप्तीचे आदेश मागे घेण्यात आले आहेत. या मालमत्तेत जरंडेश्वर साखर कारखाना, काही जमीन आणि इमारतीतील काही भाग असा समावेश होता. साताऱ्यामधल्या चिमणगाव गोटा या गावामध्ये जरंडेश्वर मालमत्तेवरची जप्तीचे आदेश देखील मागे घेतले आहेत.

यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसह अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदीवरुन आरोप झाले होते. त्यामुळे त्या संदर्भातील संपत्ती जप्त करण्यात आली होती. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या संदर्भात तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनंतर आयकर विभागाने कारवाई केली होती.

मनी लॅड्रिंगच्या आरोपाखाली माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हे तुरुंगात आहेत. त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, १० दिवसांपर्यंत त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे. दुसरीकडे माजी मंत्री नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. त्यातच अजित पवार यांच्यावर आरोप झाल्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT