Satara : कोयना भूकंपग्रस्तांच्या चौथ्या पिढीतील वारसांना मिळाले दाखले...

Shambhuraj Desai पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे भूकंपग्रस्तांच्या व्याख्येत शासनाने बदल केला आहे.
Eknath Shinde, Shambhuraj Desai
Eknath Shinde, Shambhuraj Desaisarkarnama
Published on
Updated on

सातारा : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे भूकंपग्रस्तांच्या व्याख्येत शासनाने बदल केला आहे. त्यामुळे आता भूकंपग्रस्तांच्या चौथ्या पिढीला भूकंपग्रस्तांचे दाखले देणे शक्य झाले आहे. त्याअनुषंगाने आज पाटण प्रांताधिकारी सुनील गाढे यांच्या हस्ते तालुक्यातील 36 लाभार्थ्यांना भूकंपग्रस्त दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

भूकंपग्रस्तांच्या व्याख्येत केलेल्या बदलामुळे मूळ भूकंपग्रस्त व्यक्तीचे प्रमाणपत्र हे पणतू, खापर पणतू या स्तरापर्यंत हस्तांतरण अनुज्ञेय केले आहे. त्यामुळे मूळ भूकंपग्रस्त लाभार्थ्यांच्या चौथ्या पिढीतील तरुणांना म्हणजेच पणतू, पणतींना शासन सेवेतील भूकंपग्रस्त या वर्गवारीतून नोकरी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत असून विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना धन्यवाद दिले आहेत.

15 डिसेंबरपर्यंत पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने पुढील दोन दिवस पूर्ण कागदपत्र सादर केल्यानंतर एका तासात दाखला संबंधित उमेदवाराला मिळेल या दृष्टीने प्रयत्न राहणार असल्याचे उपविभागीय अधिकारी श्री. गाढे यांनी स्पष्ट केले आहे. नोकरीसाठी विशेषतः पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या पाटण तालुक्यातील तरुणांना शुभेच्छा दिल्या आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे परिसरातील तरुणांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण असून या निमित्त त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे.

Eknath Shinde, Shambhuraj Desai
Karad News: सैनिकांच्या प्रश्नाबाबत राज्य सरकार संवेदनशील : शंभूराज देसाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com