Jitendra Awhad, Ajit Pawar and Anand Paranjpe Sarkarnama
मुंबई

Anand Paranjape : 'अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्य; तर जितेंद्र आव्हाड...'

Thane Political News : 'आव्हाड स्वतःला पवारसाहेबांपेक्षा मोठे समजायला लागले आहेत.'

सरकारनामा ब्यूरो

पंकज रोडेकर-

Thane News : अजित पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील सूर्य आहेत. लवकरच मकरसंक्रांत येते आहे, सूर्याचे उत्तरायण सुरू होईल आणि सूर्याचे तेजदेखील वाढेल. यामुळे रात्रीतल्या या काजव्यांनी फार सूर्याबद्दल बोलू नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे.

तर आव्हाडांनी हेदेखील आत्मपरीक्षण करावे की, जिल्ह्यांमध्ये ते सोडून एकमेव आमदार होते, तेदेखील त्यांच्याबरोबर का नव्हते, असा सवालही उपस्थित केला आहे. तसेच आव्हाड हे स्वत:ला शरद पवारसाहेबांपेक्षा मोठे समजायला लागल्याची खोचक टीका आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी केली आहे.

डॉ. जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थी, आत्मकेंद्रित असल्याने त्यांना अजित पवारांचा स्वभाव पचनी पडत नसेल. आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार सुभाष भोईर, आमदार निरंजन डावखरे, आमदार गणेश नाईक हे आव्हाडांच्या स्वार्थी, आत्मकेंद्रित राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले. आव्हाड स्वतःला पवारसाहेबांपेक्षा मोठे समजायला लागले आहेत.अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्य आहेत, असा जोरदार प्रहार परांजपे यांनी आव्हाड यांच्यावर केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सोमवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आपल्या प्रसिद्धीसाठी बेछूट आरोप केले आहेत. शरद पवार यांचे योगदान, मग ते समाजकारणातील असेल, राजकारणातील असेल, ते नाकारण्याचे कुठलेही कारण नाही. पण ज्या वेळेला अजित पवारांनी 1991 मध्ये बारामती लोकसभा लढण्याची संधी दिली. त्यानंतर सातत्याने होणाऱ्या प्रत्येक विधानसभेची निवडणूक, बारामती विधानसभेतून वाढत्या मताधिक्याने अजित पवार जिंकत आले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT