Jitendra Awhad: '...तेव्हा अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं ही आमची चूकच' ः जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

Jitendra Awhad on Ajit Pawar : 'अजित पवारांनी पक्षात वर्षानुवर्षे दादागिरीच केली'; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
Jitendra Awhad and Ajit Pawar
Jitendra Awhad and Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट करताना दिसले आहेत. शरद पवार गटातील इतर नेते अजित पवारांबाबत सावध भूमिका घेत असताना जितेंद्र आव्हाड मात्र थेटपणे अजित पवारांवर टीका करताना दिसत आहेत. आता आव्हाडांनी मोठा गौप्यस्फोट करीत पक्षात वर्षानुवर्षे अजितदादांनी दादागिरीच केली असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

अजित पवार यांचे होम ग्राउंड मानले जाणाऱ्या पुण्यात जितेंद्र आव्हाडांनी पत्रकारांशी संवाद साधत अजित पवारांवर निशाणा साधला. यावेळी रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे अजित पवारांमुळेच निवडून आले असल्याचे वक्तव्य केले होते.

त्या वक्तव्याचा समाचार घेताना आव्हाड म्हणाले, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये ठसा उमटवणाऱ्या शरद पवारांचे बारामतीमध्ये काहीच योगदान नाही का ? असा सवाल करत बोलण्यापूर्वी चाकणकर यांनी इतिहास भूगोल जाणून घेण्याचा सल्ला त्यांनी चाकणकर यांना दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jitendra Awhad and Ajit Pawar
Mumbai News : ट्रकचालक आंदोलनाचा मुंबईकरांना फटका ; जीवनावश्यक वस्तूंना लागणार रोख ?

'शरद पवार हे परंपरेने आले नाहीत, तर त्यांनी स्वतःच मतदारसंघ निर्माण केला. महाराष्ट्रात त्यांनी स्वतःची एक इमेज बनवली. अनेक नेते निवडून आणले, अनेक कार्यकर्त्यांना निवडून आणत नेते केले आणि त्याच्यातीलच एक म्हणजे अजित पवार आहेत. त्यामुळे अजित पवार नेते कोणामुळे झाले, हे बोलताना अजित पवार गटातील नेत्यांनी भान ठेवावे, अशी समज यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

'अजित पवारांचा धमकी देण्याचा स्वभाव'

'अजित पवारांचा धमकी देण्याचा स्वभाव हा पूर्वीपासूनचा आहे. यामध्ये काही नवीन नाही. आता लोकांना ते उघड उघड धमक्या देतात हे दिसू लागले आहे. आजपर्यंत त्यांनी पक्षांत तेच केले आणि शरद पवारांची अनेक जवळची माणसं तोडली. अशा प्रकारची अजित पवारांची दादागिरी वर्षानुवर्षे पक्षात सुरू होती', अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

'अजित पवारांना उपमुख्यमंत्री करणं ही आमची चूक'

'आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संभ्रम दूर करावा, अजित पवार आणि आम्ही आता एकत्र नाही. आम्ही एकत्र निवडणुका लढणार नाही. आम्ही जेव्हा सत्तेत येऊ, तेव्हा कुणालाही पक्षात घेणार नाही आणि कोणालाही उपमुख्यमंत्री बनवणार नाही. 2019 ला अजित पवार परत आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री करणं ही आमची चूक होती,' असं आव्हाड म्हणाले.

(Edited By Ganesh Thombare)

Jitendra Awhad and Ajit Pawar
Mahavikas Aghadi : 'वंचित'ला महाविकास आघाडीत घेण्याबाबत काय ठरलं ? नाना पटोलेंचं मोठं भाष्य

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com