AAP News: सरकारी तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; भ्रष्टाचाराविरोधात 'आप' मैदानात

Vijay Kumbhar : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता 'आप'नेदेखील कंबर कसली
Vijay Kumbhar
Vijay Kumbhar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: किमान दरापेक्षा दहापट दराने निविदा मंजूर करून शासकीय व जनतेच्या तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्या अधिकारी आणि त्यांच्या राजकीय सूत्रधारावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी आज पुण्यात केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता 'आप'नेदेखील कंबर कसली आहे. 2014 च्या निवडणुकांमध्ये आपने भाजपसमोर चांगले आव्हान उभे केले होते. नंतरच्या काळात आप पक्ष म्हणून तितका प्रभावी दिसला नाही. मात्र आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'आप'कडून प्रशासकीय विभागातील विविध टेंडर प्रक्रियेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijay Kumbhar
Jitendra Awhad: '...तेव्हा अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं ही आमची चूकच' ः जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

सध्या आरोग्य विभाग 'आप'च्या रडारवर असून या विभागातील भ्रष्टाचार टप्प्याटप्प्याने पुढे आणणार असल्याचं 'आप'कडून सांगण्यात आले आहे. पत्रकार परिषदेमध्ये विजय कुंभार म्हणाले, 'कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालय व रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयामध्ये किमान दरापेक्षा दहापट जास्त दराने निविदा मंजूर करून मोठा कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला असून संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी आमची आहे.'

कुंभार म्हणाले, काही शासकीय अधिकारी सह्या करताना फक्त पैशाचं पाकीट बघूनच सह्या करतात आणि हे काही फक्त या दोन-तीन उदाहरणांपुरतं मर्यादित नाही. संपूर्ण राज्यात हाच प्रकार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. मंत्रालयात चाललेल्या भ्रष्टाचाराच्या तुलनेत ही प्रकरणेही मोठी आहेत.

या प्रकरणातील भ्रष्टाचाराचे पुरावे इतके स्पष्ट आहेत, की चौकशी न करतासुद्धा संबंधितांवर गुन्हे दाखल करता येतील. त्यामुळे सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी. पुढील काळामध्ये अशा प्रकारचे अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणणार असल्याचं कुंभार यांनी सांगितले.

(Edited By Ganesh Thombare)

Vijay Kumbhar
Raver Loksabha: एकनाथ खडसेंच्या स्वप्नांवर काँग्रेस फेरणार पाणी; पटोले रावेरबद्दल काय म्हणाले ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com