Nawab Malik  Sarkarnama
मुंबई

Nawab Malik Bail: नवाब मलिक दीड वर्षानंतर तुरुंगाबाहेर; पण कोर्टाच्या 'या' आदेशाचे करावे लागणार पालन

Nawab Malik Breaking News : नवाब मलिक यांना जामीन मंजूर करताना सुप्रीम कोर्टाने काही अटी घातल्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केल्यानंतर सोमवारी रात्री ८ वाजता जामीनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते तुरुंगाबाहेर आले आहेत.

गोवावाला कंपाऊंडमधील मनी लाँडरिंग प्रकरणी मलिकांना ईडीने २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. त्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर मलिकांना ११ ऑगस्टला जामीन मंजूर झाला. नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला असून ते तब्बल दीड वर्षानंतर तुरुंगाबाहेर आले आहेत.

नवाब मलिकांनी प्रकृतीचे कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा, अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. या जामिनाची प्रक्रिया मुंबई सत्र न्यायालयात पूर्ण केल्यानंतर मलिकांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. मात्र, मलिक तुरुंगाबाहेर आले असले तरी त्यांना कोर्टाने घातलेल्या अटींचे पालन करावे लागणार आहे.

नवाब मलिक हे गेल्या वर्षभरापासून किडनीच्या आजाराने त्रस्त असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर मलिक तुरुंगाबाहेर कधी येणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. नवाब मलिक हे रुग्णालयातून थेट घरी जाणार आहेत.

मलिकांना कोर्टाने कोणत्या अटी घातल्या?

नवाब मलिक यांना जामीन मंजूर करताना सुप्रीम कोर्टाने काही अटी घातल्या आहेत. मालिकांना ५० हजारांच्या वैयक्तिक बॅान्डवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणातील साक्षीदार व अधिकारी यांच्याशी मलिकांनी संपर्क ठेवायचा नाही.

मलिकांशी संपर्क होईल, तो नंबर ईडीच्या अधिकाऱ्यांना देण्यात यावा. मलिकांचा पासपोर्ट ईडीकडे जमा करण्यात यावा. याबरोबरच कुठल्याही माध्यमाशी संवाद साधायचा नाही, अशा अटी जामीन मंजूर करताना कोर्टाने घातलेल्या असून त्यांना या अटींचे पालन करावे लागणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT