Nawab Malik Sarkarnama
मुंबई

Nawab Malik News: नवाब मलिकांची प्रकृती खालावली, रुग्णालयात केलं दाखल

सरकारनामा ब्यूरो

Nawab Malik News: माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांची प्रकृती अचानक खालावली आहे. प्रकृती बिघडल्याने मलिक यांना कुर्ला येथील क्रिटिकेअर सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मलिक हे वैद्यकीय कारणांमुळे तुरुंगाबाहेर आहेत. मलिक यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यामुळे आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

नवाब मलिक (Nawab Malik) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मोठे नेते असून, ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला होता. नवाब मलिक यांना ईडीने 2022 मध्ये मनी लाँड्रिंग कायद्याखाली अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. दरम्यान, ऑगस्ट 2023 मध्ये ते जामिनावर तुरुंगातून बाहेर आले. प्रकृतीचे कारण देत जामीन मिळावा, अशी मागणी तेव्हा त्यांनी केली होती. अशातच आता जामिनावर बाहेर असलेल्या मलिकांची प्रकृती अचानक खालावली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आधी तटस्थ नंतर अजित पवार गटात सामील

नवाब मलिक जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवार आणि अजित पवार अशा दोन गटांमध्ये विभागली होती. अशा परिस्थितीत मलिक कोणत्या गटात सामील होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सुरुवातीला त्यांनी तटस्थ भूमिक घेतली. मात्र, नंतर त्यांनी अजित पवार गटाला समर्थन देण्याचा निर्णय घेतला.

दिलीप वळसे पाटलांवरही रुग्णालयात उपचार सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. वळसे पाटील यांच्या पाठीला, पायाला आणि हाताला दुखापत झाली आहे. दिलीप वळसे पाटील अंधारात लाइट सुरू करायला जात असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पडले. यामुळे त्यांना दुखापत झाल्याची माहिती पाटील यांनी स्वतः एक्स पोस्ट करत दिली आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT