Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री दिलीप वळसे पाटलांचा अपघात झाला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दिलीप वळसे पाटील (Dilip walse Patil) पुण्यातील घरात घसरून पडले. यात त्यांच्या खुब्याला दुखापत झाली आहे. तसेच त्यांचा हातही फ्रॅक्चर झाला आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी वळसे पाटलांच्या हाताला मार लागला होता. आता पडल्याने तोच हात पुन्हा फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत वळसे पाटलांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ते म्हणाले, बुधवारी रात्री घरात पडल्यामुळे फ्रॅक्चर झाले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.