NCP MLA Disqualification  Sarkarnama
मुंबई

NCP MLA Disqualification : '10 व्या सूचीचा गैरवापर करून आमदारांना धमकावू नका'; नार्वेकरांनी शरद पवार गटाला फटकारले!

NCP MLA Disqualification Case : "या प्रकरणात कुणीही पक्ष सोडलेला दिसून येत नाही..."

Chetan Zadpe

Mumbai News : राज्यघटनेत असलेल्या पक्षांतराबाबतचा दहाव्या सूचीचा राजकीय पक्ष चालवण्यासाठी शस्र म्हणून वापर करता येत नाही. त्यामुळे 10 व्या सूचीचा गैरवापर करू नये, अशा शब्दांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शरद पवार गटाला सुनावले आहे. आमदारांचा अभिव्यक्तीला दबण्यासाठी या कायद्याचा वापर होऊ शकत नाहीत, असे म्हणत अध्यक्षांनी शरद पवार गटाच्या तिन्ही याचिका फेटाळून लावल्या. यामुळे अजित पवारांच्या आमदारांवरील अपात्रतेचे संकट दूर झाले आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? याबाबत विधिमंडळ बहुमत हा निकष आधार नार्वेकरांनी धरला. पक्ष आणि नेतृत्व रचना हे दोन्हीही निकष ग्राह्य धरता येणार नाहीत, असेही नार्वेकरांनी सांगितलं. नवनवे पक्ष आणि विचारसरणीसोबत युती - आघाडी होताना पाहतो. मात्र, याचा अर्थ प्रत्येकवेळी घटनेतील दहाव्या सूचीनुसार कारवाई करावी, असा होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व शरद पवार या दोन गटांतील हा पक्षाच्या आतील वाद आहे. यामुळे या प्रकरणात कुणीही पक्ष सोडलेला दिसून येत नाही. अशा परिस्थितीत दहाव्या सूचीनुसार कारवाई करता येणार नाही, असे नार्वेकर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांनी पक्षविरोधात काम केले असे या प्रकरणात म्हणता येणार नाही. विधानसभा अध्यक्षांचा या सर्व घटनांशी तसा काही संबंध नसतो. विधानसभा अध्यक्ष हा केवळ कायद्याचा पालक असतो. पक्षातले वाद हे पक्षांतर्गच सोडवले गेले पाहिजेत, असे राहुल नार्वेकर म्हणाले.

अपात्र आमदार कोण ?

अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) असल्याने त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. त्यानुसार अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरविण्यात आले आहेत. तर शरद पवार (Sharad Pawar) गटाचेही आमदारांना पात्र ठरवले आहे, असा निर्णय अध्यक्षांनी दिले आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT