NCP MLA Disqualification  Sarkarnama
मुंबई

NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी अपात्रता प्रकरण लांबणार? 10 दिवस मुदतवाढ मागण्याची शक्यता!

NCP MLA Disqualification Hearing Possibly To Postponed : विधानसभा अध्यक्षांचा व्यस्त कार्यक्रम...

Chetan Zadpe

Mumbai Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी राज्य विधिमंडळात सुनावणी पार पडण्याचे आज नियोजित आहे. शरद पवार गटाचे जयंत पाटील यांची उलट तपासणी पार पडणार आहे. तर अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांचीही उलट तपासणी होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी आता मात्र विधीमंडळ 10 दिवसांची मुदतवाढ मागू शकते, अशी शक्यता पुढे येत आहे. (Latest Marathi News)

लोकसभा सभागृहाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद पार पडणार आहे. महाराष्ट्रात 27 ते 29 जानेवारी दरम्यान अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील सर्व विधानसभा व विधानपरिषदेचे सभापती, उपसभापती व सचिव राहणार उपस्थित राहणार आहेत.

परिषदेच्या तयारीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11 वाजता बैठक आयोजित केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य शासनाचे व महापालिकेचे बडे अधिकारी बैठकीला लावणार हजेरी लावणार आहेत.

विधीमंडळात पार पडणाऱ्या परिषदेमुळे 3 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणी घेणे कठीण होणार आहे. विधीमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी मुदतवाढीसाठी लवकरच अर्ज करण्याची शक्यता आहे.

अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीस वेळ लागून, यासाठी नियोजित वेळेपेक्षा विलंब होण्याची शक्यता आहे. अध्यक्षांच्या व्यस्ततेमुळे सुनावणीची प्रक्रिया आणि अंतिम निकाल येण्यात अवधी लागून, प्रकरण लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT