Supriya Sule, PM Narendra Modi Sarkarnama
मुंबई

Supriya Sule News : मुंबईचा कारभार PMO कडून चालवला जाणार का ? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मुंबईचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी मोदी सरकारने नीती आयोगाला सोपवली आहे. मोदी सरकार व राज्य सरकारला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात आले. "नीती आयोग मुंबईता विकासाचा आराखडा राबवणार आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मुंबई महापालिका आणि मुंबईतल्या आमदार खासदारांना काहीही अर्थ राहणार नाही. एकप्रकारे पंतप्रधान कार्यालयकडून मुंबईचा कारभार चालवला जाणार का? हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अपयश आहे.केंद्र सरकार जे सांगते, त्या पावलावर पाऊल इथलं सरकार टाकत आहे,"

राज्य सरकारसमोर नीती आयागाने मुंबईच्या विकासाबाबत जे सादरीकरण केले, ते एका खासगी कंपनीने तयार करून दिले होते. या खासगी कंपनीने ही माहिती महाराष्ट्र सरकारच्या एमएमआरडीएकडूनच मिळवली आहे. महाराष्ट्र सरकारकडूनच माहिती मिळवून ती पुन्हा महाराष्ट्र सरकारपुढेच सादर करण्यात आली. सरकारमधील कोणत्याच नेत्याला हे कसे कळले नाही? असे सुळे म्हणाल्या. या आंदोलनाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, नेते उपस्थित होते.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT