INDIA Mumbai Meet : ठाकरे ज्याला ‘गरुड झेप’ म्हणतात ही तर श्वापदांची टोळी; बावनकुळेंचे सडेतोड प्रत्युत्तर

Opposition Mumbai Meeting Live : तुम्ही मोदी यांना जेवढ्या शिव्या द्याल जनता पंतप्रधान मोदी यांच्यावर तेवढे जास्त प्रेम करेल,"
INDIA Mumbai Meet
INDIA Mumbai MeetSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : सत्ताधारी पक्षाच्या एनडीए (NDA) आघाडीला आव्हान देण्यासाठी आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या ‘इंडिया’ (India) आघाडीची एकजूट बांधण्याचा प्रयत्न होत आहे. बैठकीवर भाजपचे नेते जोरदार हल्लाबोल करीत आहेत. "मोदींचे साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीची पावले मजबुतीने पडत आहेत," अशी टीका ठाकरे गटाने 'सामना'तून केली आहे. त्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जहरी टीका केली आहे. (Latest Marathi News)

"मुंबईत होणारी इंडियाची बैठक नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक आहे. उद्धव ठाकरे ज्याला ‘गरुड झेप’ म्हणत आहेत ती गरुड झेप नाही तर,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांची टोळी आहे," असे सडेतोड उत्तर बावनकुळेंनी दिले आहे.

INDIA Mumbai Meet
INDIA Mumbai Meet : खर्गेंच्या विश्वासू खासदाराने ठाकरे गटातील नेत्यांसोबत केली पाहणी ; खासदार सावंत, नार्वेकर गुंतले तयारीत..

बावनकुळे म्हणाले, "राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या याच टोळीने शंभर कोटी वसुली केली, कोरोना काळात कोट्यवधींची कंत्राटे घशात घातली. मृतदेहांसाठीच्या बॅगही त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. तुम्ही लालू प्रसाद यादवांच्या माध्यमातून मोदी यांच्या ‘नरड्यावर बसण्याचे स्वप्न’ बघा. पण जनता तुमच्या छाताडावर बसेल. तुम्ही मोदी यांना जेवढ्या शिव्या द्याल जनता पंतप्रधान मोदी यांच्यावर तेवढे जास्त प्रेम करेल,"

INDIA Mumbai Meet
Eknath Shinde News : फॉर्म्युला ठरला ; अजितदादा-फडणवीस-मुख्यमंत्री शिंदे असा असेल फायलींचा प्रवास ; वित्त विभागाने नाकारलेल्या...

बावनकुळे यांनी टि्वट केले आहे. तुम्ही तुमचा ‘परिवार बचाव’ अजेंडा घेऊन बैठका करा. कोट्यवधी देशवासीयांच्या स्वप्नपूर्तीचा अजेंडा घेऊन पंतप्रधान मोदी यांचे देशसेवेचे कार्य अखंड सुरू राहणार आहे. नरेंद्र मोदी यांचा तुमच्या (I.N.D.I.A.) विरोधातील संघर्ष हा स्वतःचे कुटुंब वाचवण्यासाठी नाही तर, देश वाचविण्यासाठी आहे, असेही त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com