Supriya Sule Sarkarnama
मुंबई

Supriya Sule On NitishKumar: नितीशकुमारांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'इंडिया आघाडीत...'

Bihar Politics : नितीशकुमार भाजपसोबत गेल्यामुळे 'इंडिया' आघाडीला मोठा धक्का बसला

Ganesh Thombare

Mumbai News: बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असून महागठबंधनचे सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नितीशकुमार हे आता भाजपसोबत सत्तास्थापन करणार आहेत. 'इंडिया' आघाडीची मोट बांधताना नितीशकुमार यांची महत्त्वाची भूमिका होती. मात्र आघाडीबरोबर काडीमोड घेत ते भाजपसोबत गेल्यामुळे 'इंडिया' आघाडीला मोठा धक्का बसला आहे. (MP Supriya Sule On Nitish Kumar resigns as Bihar CM)

नितीशकुमार लवकरच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 'इंडिया' आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावणारे नितीशकुमार हेच भाजपबरोबर गेल्याने आघाडीतील नेत्यांच्या आता संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली. तसेच केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?

"'इंडिया' आघाडीमध्ये आपापल्या परीने प्रत्येकजण काम करत आहे. ही आमची वैचारिक लढाई आहे. दिल्लीत दडपशाही सुरू आहे. यंत्रणांचा गैरवापर करत सत्ता फोडणे, घरे फोडण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो. मात्र या दडपशाहीच्या विरोधात आमची लढाई सुरूच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राजीनाम्यानंतर नितीशकुमार काय म्हणाले ?

बिहारमध्ये जवळपास दीड वर्षापासून महागठबंधनचे सरकार होते. मात्र, परिस्थिती चांगली नव्हती. आम्ही चांगले काम करीत होतो. पण काही लोक आमच्यावर नाराज होते. त्यामुळे आम्ही आमच्या काही लोकांचं ऐकलं. आम्ही काम करतो. महागठबंधनच्या सरकारमध्ये कोणी काम करीत नव्हतं. त्यामुळे राज्यात लोकांना अडचण झाली होती, अशी प्रतिक्रिया नितीशकुमारांनी दिली.

(Edited By-Ganesh Thombare)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT