Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ncp News : पक्ष अन् चिन्ह गेले; आता 5 आमदार पवारांना धक्का देणार; लवकरच दादा गटात जाणार ?

Political News : शरद पवार गटातील 5 आमदारही अजित पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

Jui Jadhav

Mumbai News : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी नाव आणि चिन्ह अजित पवारांना दिल्याने शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांचा झाला असल्यामुळे आता शरद पवार गटातील 5 आमदारही अजित पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या काळात शरद पवार गटाचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांना मोठा धक्का दिला आहे. मात्र, या नंतर आता किती आमदार शरद पवारांसोबत शिल्लक राहतात हा प्रश्न आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितलं आहे की, येत्या दोन दिवसात शरद पवार गटाचे पाच आमदार देखील अजित पवार गटात सहभागी होणार आहेत. यामुळे आता शरद पवारांना उरलेल्या आमदारांना टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

हे पाच आमदार तिथे गेल्यावर अजित पवार (Ajit Pawar) यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयावर ही दावा करण्याची शक्यता आहे. ज्यावेळी शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले, त्यावेळी शिवसेनेच्या शाखांवर एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटाने दावा केला होता. यामुळे दोन गटात राडे देखील झाले होते. तशीच काहीशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत देखील होण्याची शक्यता आहे. अजित पवार गटांकडून येत्या काळात शरद पवार गटाची कोंडी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाऊ शकतो आणि यासाठी पक्ष कार्यालयांवर ही दावा केला जाऊ शकतो.

राष्ट्रवादी आमदार अपात्र होणार का?

राष्ट्रवादी नाव आणि पक्ष अजित पवारांना दिल्यावर आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र तो निकाल शिवसेनेपेक्षा वेगळा असणार आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाच्या निकालाचा परिणाम होणार नाही, असे वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी आमदार अपात्रप्रकरणी मेरिट नुसारच निकाल दिला जाणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भावनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवलेली नाहीत, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांच्यासमोर सर्व आमदारांची उलटतपासणी पार पडली आहे. राहुल नार्वेकर लवकरच निकाल देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचली आहे. शिवसेना निकालाहून वेगळा निर्णय लागण्याची शक्यता आहे.

(Edited By- Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT