Asaram Bapu News : आसाराम बापू एकेकाळी अध्यात्म क्षेत्रातलं सर्वोच्च पदावर पोहोचलेलं नाव होतं. 400 हून अधिक आश्रम, राजकीय नेतेमंडळी, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक यांच्यासह देशभरात तयार केलेलं भक्तांचं जाळं, हजारो कोटींची उलाढाल असं विशाल साम्राज्य आध्यात्मिक गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसाराम बापूंनी निर्माण केले.
आसाराम बापूंवर बलात्काराचा गंभीर आरोप केला आणि अध्यात्म क्षेत्रात नावाजलेल्या भक्तांच्या देवघरापर्यंत पोहोचलेल्या आसाराम बापूंच्या वलयाला उतरती कळा लागली. अध्यात्मासह सर्वच क्षेत्रात खळबळ उडाली. सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले आसाराम बापू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
सुरतच्या दोन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापू यांच्यावर 2013 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने सहा आरोपींना निर्दोष ठरवत आसाराम बापूंना दोषी ठरवले.या प्रकरणात 2018 मध्ये जोधपूर कोर्टाने(Court) त्यांना 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.यानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती खालावली असून, आसाराम बापूंवर 13 जानेवारीपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आसाराम बापू (Asaram bapu) यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून जोधपूर येथील AIIMC रुग्णालयात उपचार केले जात आहेत. योग वेदांत समितीने याबाबत बुधवारी (ता.7) पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. ते सध्या अतिदक्षता (ICU) विभागात असल्याची माहिती समितीने या वेळी दिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आसाराम बापूंचे वय सध्या 86 असून, ते हृदयविकार,प्रोस्टेट वाढणे, संधिवात आणि अशक्तपणा अशा आजारांनी ग्रस्त आहेत. एम्सच्या अहवालानुसार, त्यांच्या हृदयात 3 गंभीर ब्लॉकेज आहेत. तसेच हिमोग्लोबीन कमी होत असल्याने रक्तस्त्रावाचे प्रमाण वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदाबाद येथील आसाराम आश्रम सत्संग वक्ता रामानंद आणि साध्वी रेखा बहन यांनी आसाराम यांना तणावमुक्त वातावरणात अनुकूल, उत्तम आणि त्वरित योग्य उपचार मिळावेत, अशी मागणी केली आहे.
रामानंद म्हणाले, आसाराम बापूंच्या पाठीशी अनुयायींची प्रचंड आस्था, श्रद्धा आणि प्रार्थना आहे. पण त्यांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. असे असताना अनुकूल, उत्तम व त्वरित योग्य उपचार मिळावेत अपेक्षित होते, पण तसे होताना दिसत नाही. त्यांनी जात, धर्म, पंथ, संप्रदाय असा कोणताही भेदभाव न करता त्यांच्या विविध परोपकारी सेवेचा लाभ कोट्यवधी लोकांनी आजवर घेतला. याचवेळी बापूंच्या खटल्यातील वास्तव, तथ्ये आणि पुरावे पाहता, त्यांना निर्दोष सोडले पाहिजे, अशी मागणी आम्हा साधकांसह आद्य शंकराचार्य, साधू - संतांची असल्याचेही त्यांनी सांगितले.
ज्यावेळी 2016 आसाराम बापूच्या संपत्तीची चौकशी झाली होती. त्यावेळी 2300 करोड रुपयांची संपत्ती त्यांच्या नावाने असलेल्या ट्रस्टकडे असल्याचे समोर आले होते.तसेच 400 आश्रम होते.आसाराम बापूंचा टांगेवाला,कथावाचक ते धर्मगुरू असा प्रवास राहिला आहे. पाकिस्तानात जन्म झालेल्या आसाराम यांनी आपला पहिला आश्रम अहमदाबादमधील मोटेरा या ठिकाणी तयार केला.यानंतर लोकांमध्ये प्रचार केला आणि त्यामुळे आसारामच्या भक्तांमध्ये प्रचंड वाढ झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.