Mumbai News : महाराष्ट्र विधानपरिषद सभागृहात भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) होते. यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनतेपदी शिवसेना ठाकरे गटाचे नेते व आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्याकडे आहे.
परंतु आता ठाकरे गटाकडून विधान परिषेदेचे सदस्य झालेल्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश केल्याने, ठाकरे गटाची सभागृहातील शक्ती एकने कमी होऊन ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या संख्येएवढी झाली आहे. यामुळे आता राष्ट्रवादीकडून वरच्या सभागृहातही विरोधीपक्षनेते पदावर दावा करण्यात येत आहे. (Latest Marthi News)
विधान परिषदेच्या सभागृहात शिवसेना ठाकरे गटाची सदस्यसंख्या १० एवढी होती. तर एक सदस्य शिंदे गटाकडे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्यसंख्या ९ एवढी आहे. आता ठाकरे गटाकडून वरच्या सभागृहात आमदार असणाऱ्या मनिषा कायंद यांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळे ठाकरेंची सदस्यसंख्या ९ इतकी झाली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची सदस्यसंख्या समसमान झाली आहे.
सद्यस्थितीत विधानसभा सभागृहाचे विरोधीपक्षनेते पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. तर वरच्या सभागृहात म्हणजे विधानपरिषेदेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. मात्र आता मनिषा कायंदे यांच्या जाण्याने ठाकरे गटाचं विधान परिषदेतलं सदस्य संख्याबळ कमी झालं आहे. यामुळे आता दानवेंकडे असलेले विरोधीपक्षनेते पद राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे यांना द्यावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते.
या विषयावर भाष्य करताना अमोल मिटकरी म्हणाले, "अंबादास दानवे यांचा अभ्यास कमी आहे, असं कुठेही मी म्हंटलं नाही. जर समजा महाविकास आघाडीने ठरवलं की, विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेकडे ९ सदस्य आहेत. शिवसेनेकडे अनिल परब अभ्यासू आहेत, तर आमच्याकडे एकनाथ शिंदे हे अनुभवी नेते आहेत. भाजपचा सामना करायचा असेल तर अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून खडसेंकडे पाहायला हवे, दानवेसुद्धा अभ्यासू आहेत. मात्र माझी अशी भावना आहे, असे मिटकरी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.