Ajit Pawar and Jayant Patil Sarkarnama
मुंबई

Jayant Patil : जयंत पाटलांचा अजितदादांबाबत मोठा दावा; "...त्याचआधी 2 जुलैला त्यांनी वेगळा निर्णय घेतला!"

Deepak Kulkarni

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटातील प्रमुख नेतेमंडळींकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. याचसोबत दोन्ही गटाकडून दिवसागणिक नवे गौप्यस्फोटही केले जात आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटी दरम्यानच्या घडामोडींवर भाष्य केले आहे. ते म्हणाले,अजित पवार विरोधी पक्षनेते झाले, त्याचवेळी त्यांना मी बोललो होतो की तुम्ही अध्यक्ष व्हा,मी विरोधी पक्षनेता होतो. मात्र, त्यांनी माझा चॉईस हा विरोधी पक्षनेता आहे. अध्यक्षपदामध्ये रस नाही असे सांगितले. पण त्याचवेळी ते मला बोलले असते तर षण्मुखानंद सभागृहात स्वत: मी 5 वर्ष पूर्ण केली असून अजित पवार यांना अध्यक्ष करा असे जाहीर केले असते असेही त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते होते, त्यावेळी आपण त्यांना अध्यक्ष व्हा असं सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी नकार दिला होता.आपल्याला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांना अध्यक्ष करण्यासाठी बैठकही बोलावली होती,परंतु, त्याचआधी 2 जुलैला अजित पवारांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतल्याचा धक्कादायक दावाही त्यांनी यावेळी केला.

आता जे होईल ते होईल...

आपला पक्ष मोठा करायचा असेल तर त्यासाठी लोकांपर्यंत पोहचायला हवं आणि त्यासाठी परिवार संवाद यात्रा काढली होती.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर एकसंध असता तर 2024 लाएकहाती सत्ता आणली असती. 2024 साली आपला पक्ष मोठा झाला पाहिजे असं स्वप्न होतं. पण आमच्या इतर सहकाऱ्यांनी काही कारणास्तव निर्णय घेतला. आपण पक्षात जे झालं हे मिटावं म्हणून मी काम करत होतो.त्याविषयी मी प्रफुल पटेल, अजित पवार यांच्यासोबत देखील बैठका देखील केल्या. परंतु आता त्यांनी निर्णय घेतला आहे. आता पुढं जे होईल ते होईल असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रातील भाजप (BJP) सरकारकडून शिवसेना ऐकत नाही म्हणून त्यांच्यात फूट पाडण्यात आली. भाजपच्या जवळ जे लोक गेले त्यांचं अस्तित्व संपुष्टात आणण्यात आल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला.पण आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जर मोदी एकहाती सत्ता घेऊन आले तर त्यांना छोट्या पक्षांची गरज राहणार नाही. त्यांच्या वळचणीला गेलेल्या पक्षांसाठी धोक्याची घंटा असल्याचे विधानही त्यांनी केले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT