Karnatak BJP Politics : कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' राहिले दूरच,भाजपच्याच मागे लागला भ्रष्टाचाराचा भुंगा!

B. S. Yediyurappa : कोरोनाकाळात येडियुरप्पांनी ४० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा भाजप आमदाराकडूनच आरोप...
Karnatak BJP Politics
Karnatak BJP Politics Sarkarnama
Published on
Updated on

Karnatak News : काँग्रेससह अन्य पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपने कर्नाटकमध्ये घराणेशाहीच जपली. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनेक महिने प्रदेशाध्यक्षपद रिक्त होते. अखेर त्या पदावर माजी मुख्यमंत्री, भाजपचे दिग्गज नेते बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीच्या जेमतेम दीड महिन्यानंतर कर्नाटक भाजपमध्ये पुन्हा घमासान सुरू झाले. भाजपचे विजयपूर (आधीचे विजापूर) येथील आमदार बसनगौडा पाटील यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला कोंडीत पकडले आहे.

विजयेंद्र यांच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीचा निर्णय माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी.एस.येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांचे उघड विरोधक असणारे बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या पचनी पडला नव्हता. त्याचा वचपा यत्नाळ यांनी नुकताच काढला आहे. येडियुरप्पा हे मुख्यमंत्री असताना कोरोनाची लाट आली होती. कोरोनाच्या काळात बी.एस.येडियुरप्पा यांनी ४० हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप यत्नाळ यांनी केला आहे.

Karnatak BJP Politics
H. D. Kumaraswamy : पन्नासहून अधिक आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार पडणार ?

भाजपने आपल्याला पक्षातून काढून टाकले तर त्या घोटाळ्याची सर्व कागदपत्रे उघड करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. भाजपमधील नेते आता आक्रमक झाले असून, पक्षाने यत्नाळ यांना शेवटचा इशारा द्यावा, अशी मागणी सुरू झाली आहे. यत्नाळ यांच्या वक्तव्यांमुळे भाजपला लोकसभेच्या आगामी निवडणुकीत नुकसान होऊ शकते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, असा सूर पक्षातून निघू लागला आहे.

भाजपमध्ये करडी पक्षशिस्त आहे, पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही, पक्षविरोधी कारवाया खपवून घेतल्या जात नाहीत, असा संदेश पक्षनेतृत्वाकडून सातत्याने दिला जातो. असे असले तरी पक्षाच्या विरोधातील क्षीण का होईना आवाज अधूनमधून बाहेर येत असतो. यंदा कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव केला. भाजप सरकारवर काँग्रेसने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. हे सरकार 40 टक्के कमिशन घेणारे आहे, असा प्रचार काँग्रेसने प्रभावीपणे केला होता. त्याचा परिणाम दिसून आला, भाजपला फटका बसला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता यत्नाळ यांनी ४० हजार कोटी रुपयांच्या कोविड घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आम्ही निवडणुकीदरम्यान भाजप(BJP)वर केलेल्या आरोपांत तथ्य होते, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. यत्नाळ यांनी घोटाळ्याची कागदपत्रे उघड करावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दुसरीकडे, यत्नाळ यांच्या आरोपांमागे काँग्रेस आहे, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.

कर्नाटकमधील काँग्रेस सरकार पडणार असे दावे भाजप नेत्यांकडून सातत्याने केले जात आहेत. त्यात आता एच. डी. कुमारस्वामी(H. D. Kumaraswamy) यांची भर पडली. कुमारस्वामी यांचा जनता दल (धर्मनिपेक्ष) हा पक्ष लोकसभा निवडणूक भाजपसोबत, म्हणजे एनडीएत सहभागी होऊन लढवणार आहे. कर्नाटकमध्ये 'ऑपरेशन लोटस' यशस्वी होणार, असा आदा आता कुमारस्वामी यांनीही केला आहे. काँग्रेसचे ५० आमदार फुटणार असा दावा भाजपच्या एका आमदाराने काही दिवसांपूर्वी केला होता.

Karnatak BJP Politics
Lok Sabha Election 2024 : नवे हिंदुहृदयसम्राट... भाजपचा लोकसभेसाठी मोठा प्लॅन; थरूरांनी थेट घेतलं नाव

या पार्श्वभूमीवर यत्नाळ यांनी येड्डयूरप्पा यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप भाजपला मागे ढकलणारे आहेत. सर्वच विरोधी पक्ष भ्रष्टाचारी आहेत, असे 'नॅरेटिव्ह' भाजपने 'सेट' केले आहे. यत्नाळ यांच्या आरोपांमुळे त्याला तडा गेला आहे. कर्नाटकमध्ये 'आॅपरेशन लोटस' होईल का, ते कधी होईल, हे आता बाजूला पडले आहेत. यत्नाळ यांच्या आरोपांमुळे झालेल्या 'डॅमेज'ला 'कंट्रोल' कसे करावे, असा प्रश्न आता भाजपसमोर निर्माण झाला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जनता दलाला (धर्मनिरपेक्ष) एनडीएत सहभागी करून घेले होते. या निर्णयावरुन कर्नाटक भाजपमध्ये असंतोष निर्माण झाला होता. हा निर्णय घेताना पक्षश्रेष्ठींनी आपल्याला विश्वासात घेतले नाही, अशी काही नेत्यांची भावना होती. अनेक दिग्गजांना डावलून पुत्र विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावण्यात येडियुरप्पा यशस्वी झाले होते. त्याचाही राग त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांमध्ये होता. यत्नाळ यांचे आरोप हे त्याचीच परिणिती आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे या घडामोडी भाजपसाठी मारक ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे भाजपकडून यत्नाळ यांच्यावर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Karnatak BJP Politics
Amol Kolhe: 'आपल्यालाच का टार्गेट केलं जातंय ?' कोल्हेंचा सवाल; मोदी, अजित पवार गटावरही केले गंभीर आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com