Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

अकरा उमेदवारांसाठी पवारांसह राष्ट्रवादीचे 24 दिग्गज नेते मैदानात

निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसोबत आघाडी केली आहे. ही आघाडी 20 जागांवर निवडणूक लढवत आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Election 2022) राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची (Shiv Sena) आघाडी झाली आहे. विधानसभेच्या 40 जागांपैकी राष्ट्रवादीकडून 11 तर शिवसेनेकडून नऊ उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत. सर्व पक्षांनी आता प्रचाराचा धुराळा उडवला आहे. राष्ट्रवादीकडून (NCP) प्रचारासाठी 24 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

स्टार प्रचारकांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), खासदार प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह 24 नेत्यांचा समावेश आहे. गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याने सर्वच पक्षांचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रामुख्याने भाजप व काँग्रेसमध्येही लढत होणार असल्याचे चित्र आहे. (Goa Election Update)

गोव्यात (Goa) राष्ट्रवादी व शिवसेनेकडून काँग्रेसशी (Congress) युती करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण काँग्रेसकडून महाविकास आघाडीबाबत फारशी उत्सुकता दाखवण्यात आली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसनेने एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. गोव्यात सध्या भाजपचे राज्य असल्याने पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. पण पणजी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे.

या मतदारसंघात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी भाजपला रामराम ठोकत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना माईक हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. प्रचारादरम्यान त्यांच्याकडून भाजपला जोरदार टीका केली आहे. तर उत्पल यांच्यासाठी शिवसनेच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेत त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील रंगत वाढली आहे.

राष्ट्रवादीच्या गोव्यातील स्टार प्रचारक :

1. शरद पवार

2. प्रफुल्ल पटेल

3. सुनिल तटकरे

4. सुप्रिया सुळे

5. अजित पवार

6. दिलीप वळसे पाटील

7. जयंत पाटील

8. जितेंद्र आव्हाड

9. नवाब मलिक

10. धनंजय मुंडे

11. हसन मुश्रीफ

12. ए. के. शशींद्रन (केरळमधील वनमंत्री)

13. नरेंद्र वर्मा

14. फौजिया खान

15. धीरज शर्मा

16. सोनिया दुहान

17. शब्बीर अहमद विद्रोही

18. जोस फिलीप डिसुजा

19. प्रफुल्ल हेडे

20. अविनाश भोसले

21. सतीश नारायणी

22. पी. सी. चाको

23. थॉमस के. थॉमस (आमदार, केरळ )

24. क्लेडे क्रास्टो

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT