Mumbai News : बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातील 'बूथ कॅप्चर', कसे यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केलेत.
तसंच आमदार आव्हाड यांनी त्यांच्या 'एक्स' या समाज माध्यमांवर इंस्टाग्रामवरील एका खात्यावरील गोट्या गीतेचा व्हिडिओ शेअर करत केलेल्या आरोपांना अधिकच 'फोडणी' दिली. यातच वाल्मिक कराड याला 'काँट्रैक्ट' देण्याची भाषा करून जितेंद्र आव्हाड यांनी करत खळबळ उडवून दिली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी 'परळी मतदार संघात 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले. शाई लावायची आणि बाहेर जायचे. मतदान केंद्राच्या आतमध्ये तुमचे बटन दाबण्याचे काम ही गैंग करायची. सगळे एकदम ट्रांसपेरेंट पोलिसांसमोर, असे परळीचे उमेदवार राजाभाऊ देशमुख यांनी सांगितले. व्हिडियो आहेत, काही ठिकाणचे. कोण काय करणार, हे कायद्याचे राज्य आहे. पुढे कुणाला काँट्रैक्ट द्यायचे असेल, तर वाल्मिक कराडशी संपर्क साधावा', असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाले. याबाबत महाविकास आघाडीकडून (MVA) शंका उपस्थित केल्या जात आहे. ईव्हीएम शंका घेतल्या जात आहेत. लोकांना देखील ईव्हीएमबाबत शंका आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात बूथ कॅप्चरचा प्रकार झाल्याचा आरोप एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला. ते मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रात जात होते.
परळी विधानसभा मतदारसंघात एकूण 396 मतदान केंद्र आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर तिथं उच्च न्यायालयाच्या आदेशानुरा 122 मतदान केंद्र अतिसंवेदनशील असल्याचे म्हटले होते. या मतदान केंद्रांवर सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच निवडणूक अधिकाऱ्यांची होती. मात्र या निवडणुकीत 201 मतदान केंद्रावर हल्ले झाले आणि त्यातील 101 मतदान केंद्र कॅप्चर झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड आणि राजेसाहेब देशमुख यांनी केला.
जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. निवडणूक आयोग हा बेशरम लोकांचा अड्डा असून, तो सत्ताधाऱ्यांना मदत करतोय. निवडणूक अधिकाऱ्यांना आमचे आव्हान आहे की, मतदान केंद्र कॅप्चरिंगवर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. परळी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र कॅप्चरचा गोट्या गीतेचा व्हिडिओ आम्ही दिलाय, त्याला ताब्यात घेणार का? असा प्रश्न तो व्हिडिओ 'एक्स' खात्यावर देखील दाखवला आहे.
निवडणूक आयोगाने याची गांभीर्याने नोंद घेत, मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांचे लेखी जबाब जनतेसमोर घ्यावेत, बीडचं वाटोळं करणाऱ्या पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही जितेंद्र आव्हाड यांनी केली. राजेसाहेब देशमुख यांनी मतदानाच्या वेळी मतदान केंद्रात मतदान करण्याचा अधिकार मतदारांना नव्हता, मतदारांना मतदान कार्ड दाखवल्यानंतर त्यांच्या बोटावर शाही लावण्यात येत होती.मात्र त्यांचा मतदानाचा अधिकार हा दुसराच व्यक्ती ईव्हीएमचा बटन दाबून बजावत होता, असा दावा केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.