sharad pawar,sharad pawar
sharad pawar,sharad pawar sarkarnama
मुंबई

`मी पुन्हा येईन` वरून पवारांची फडणवीसांवर चौफेर टोलेबाजी!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी काल ''मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं,'' असे विधान केलं होतं. राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी फडणविसांच्या या विधानाचा समाचार घेऊन त्यांना टोला लगावला. 'मी पुन्हा येईन' असं विधान नेहमी करणाऱ्या फडणवीसांची पवारांनी खिल्ली उडवली. यावेळी उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला. मुंबईत पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. फडणवीसांवर पवार बोलत असताना उपस्थितांनी त्यांना "मी पुन्हा येईन" या विधानाची आठवण करुन दिली.

शरद पवार म्हणाले, ''फडणवीस यांचे काल मी भाषण ऐकलं. त्यांनी सांगितली मी सत्तेवर नाही असं मला वाटत नाही. ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्यामते ते अजूनही मुख्यमंत्री आहेत. असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांना अजूनही आपण सत्तेतच आहोत असे वाटते. पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर अजूनही त्यांना मुख्यमंत्रीपदी असल्याचे विस्मरण झाले नाही. ही जमेची बाजू आहे. ही कमतरता आमच्यामध्ये आहे. मी चारवेळी मुख्यमंत्री होतो हे माझ्या लक्षातही नाही. ही कमरतता मी कबुल करतो.''

''फडणवीस निवडणुकीपासून नेहमीच आपल्या भाषणात 'मी पुन्हा येईल,' असे म्हणतात. यावरुन सत्तेत येण्यासाठी या लोकांच्या वेदना किती खोल आहे, हे लक्षात येईल. पण सत्ता येते अन् जाते त्याचा कधी विचार करायचो नसतो. सत्तेत असताना सत्तेचा वापर लोकांच्या चांगल्या गोष्टीसाठी करायला पाहिजे. पण सत्ता नसेल तर विरोधी पक्षनेता म्हणून काम करणं सोपं जातं. पदावर नसताना लोकांना तक्रारींचे विश्लेषण करण्याची संधी असते. याचा आनंद मला नेहमी मिळाला. त्यातून मला शिकायला मिळते,'' असे पवार म्हणाले.

''लखीमपूर खीरी प्रश्नावर प्रमुख तीन पक्षानी बंद पुकारलं होतं. हा बंद शांततेत झाला. याबाबत तीनही पक्षाच्या नेत्यांना व सामान्य जनतेला धन्यवाद दिले पाहिजे. राज्यातील साखर कारखाने लवकरच सुरू होणार आहेत. ऊस उत्पादन चांगलं आहे. धरणेही भरली आहेत. ऊस उत्पादनाचे उच्चांक होईल. ऊस उत्पादकांना एक रकमी पैसे दिले पाहिजे,'' असे शहर पवार यांनी सांगितले.

''सत्तेचा गैरवापर करुन केंद्र सरकार महाविकास आघाडीला टार्गेट करीत आहेत. महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आघाडी सरकारमधील नेत्यांना नाउमेद करण्याची स्टे्टजी आहे. पण याची चिंता आम्ही करीत नाही,'' असे शरद पवार म्हणाले.

''लखीमपूर खीरी हिंसाचारात मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडलं. यात शेतकऱ्यांनी हत्या झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाने यात भूमिका घेणे गरजेचे होते. पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. याप्रकरणात गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा देणे गरजेचे होते. पण उत्तर प्रदेश सरकारला अद्यापही याबाबत मैान आहे. या घटनेची जबाबदारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टाळता येणार नाही, असे राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाअध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

लखीमपूर खीरी प्रकरणावरुन (Lakhimpur Khiri Violence) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. याला पवार यांनी आज प्रत्युत्तर दिले. शरद पवार म्हणाले, ''मावळ येथील घटनेला कुठलाही राजकीय पक्ष जबाबदार नव्हता, तर या घटनेला पोलिस जबाब होते. येथील स्थानिक भाजपच्या नेत्यांना याबाबत चिथावणी दिल्याने हा प्रकार झाला होता. त्यानंतर मावळच्या जनतेला भाजपची भूमिका कळल्यामुळे तिथं भाजपच्या उमेदवारांना टाळले. तेथे राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकला,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT