Mumbai Political News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला नवीन निवडणूक चिन्ह मिळाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 'तुतारी फुंकणारा माणूस' हे चिन्ह खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुका आता शरद पवार गट हीच 'तुतारी' घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. पक्षाला मिळालेल्या नव्या पक्ष चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर होणार आहे. (NCP Sharadchandra Pawar)
या पक्ष चिन्ह अनावरण सोहळ्याचा ट्रेलरदेखील आता रिलीज करण्यात आला आहे. या पक्ष चिन्हाचा अनावरण सोहळा 24 फेब्रुवारी 2024 ला किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला पक्षाचे प्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"आता अवघा देश होणार दंग, आदरणीय खासदार शरद पवारसाहेबांच्या साथीने फुंकलं जाणार विकासाचं रणशिंग ! ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षाला मिळालेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या पक्ष चिन्हाचा अनावरण सोहळा उद्या दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. चला, छत्रपती शिवरायांच्या साथीने तुतारीचा नाद दाही दिशा घुमवूया!", अशी पोस्ट शरद पवार गटाच्या अधिकृत एक्स हँडलवरून करत पक्ष-चिन्ह अनावरण सोहळ्याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 'तुतारी फुंकणारा माणूस' हे नवीन निवडणूक चिन्ह मिळालं. आता या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात येणार आहे. या सोहळ्याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये "घड्याळात वेळ झाली तुतारी फुंकण्याची, तुतारी स्वाभिमानाची, शेतकऱ्यांच्या आवाजाची, युवकांच्या ऊर्जेची, महिलांच्या भरारीची, तुतारी...तुतारी...राष्ट्रवादीची...", असं या सोहळ्याच्या ट्रेलरमध्ये म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्चमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवरच सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 'तुतारी' घेऊन लोकसभेचे रणशिंग फुंकणार आहे. हे नवीन मिळालेलं चिन्ह आता शरद पवार गटाला लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. याचाच एक भाग म्हणून रायगड किल्ल्यावर पक्ष चिन्ह अनावरण सोहळा पार पडणार आहे.
(Edited By-Ganesh Thombare)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.