लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांना लोकसभेच्या 11 ते 12 जागा हव्यात अशी माहिती मिळतेय.
महाविकास आघाडीची (MVA) लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) जागावाटपाची बैठक आज मुंबईत होणार होती. मात्र, ती रद्द करून आता 27 फेब्रुवारीला होणार आहे. या बैठकीत काही जागांवर अडलेला तिढा सोडवला जाणार आहे. मुंबईत सध्या तीन जागांवरून जागावाटपाची चर्चा अडली आहे. राष्ट्रवादीचे ईशान्य मुंबईची जागा पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर सध्या या जागेवरून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत.
याचवेळी ठाकरे गटाकडून उत्तर मुंबईच्या जागेच्या बदल्यात दक्षिण मध्य मुंबईची जागा आणि उत्तर पश्चिम मुंबईची जागा मिळवण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबईची जागा अमोल किर्तीकर, तर दक्षिण मध्य मुंबईची जागा लढण्यासाठी अनिल देसाई इच्छुक असल्याची माहिती मिळतेय, तर काँग्रेसचे (Congress) संजय निरुपम उत्तर पश्चिमची जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. या सगळ्यावर 27 फेब्रुवारीला चर्चा होणार आहे. 27 आणि 28 फेब्रुवारीला महाविकास आघाडी जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे तुतारी हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचाच भाग म्हणून उद्या रायगड किल्ल्यावर तुतारी वाजवली जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहेत. यासाठी शरद पवार यांच्यासह पक्षाचे सर्व नेते रायगडावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
(Edited by Avinash Chandane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.