Sharad Pawar Latest News : शरद पवारांची 'तुतारी' दिल्लीचं तख्त हादरवणार..!

Man Blowing Turha (Tutari) : 84 वर्षांचा योद्धा शरद पवार पुन्हा एकदा अधर्माविरोधात लढाईला सज्ज झाले आहेत.
Sharad Pawar, Tutari
Sharad Pawar, TutariSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी (Man Blowing Turha) हे चिन्ह बहाल केले आहे. आता ज्येष्ठ नेते शरद पवार ही तुतारी घेऊन दिल्लीचे तख्त हादरवणार आहेत, असा इशारा राष्ट्रवादी एसपी पक्षाने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार सत्ताधाऱ्यांना नामोहरम करण्यासाठी कोणते डाव टाकणार, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Sharad Pawar Latest News)

सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला सात दिवसांत शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षाला चिन्हे देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयोगाने कार्यवाही करत गुरुवारी उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस एसपी पक्षाला तुतारी हे चिन्ह दिले आहे. त्यानंतर पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवर आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी एल्गार पुकारला आहे. तुतारीच्या मदतीने शरद पवार दिल्लीच्या तख्ताला हादरे देणार असल्याचा इशाराच पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar, Tutari
Sharad Pawar NCP Symbol : मोठी बातमी ! शरद पवार गट 'तुतारी' घेऊन उतरणार रणांगणात

महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार'साठी (NCP) गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, खासदार शरद पवारांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच 'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकणार आहे, असे पक्षाच्या वतीने म्हटले आहे.

ECI Letter to Sharad Pawar NCP
ECI Letter to Sharad Pawar NCPSarkarnama

जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) आता थांबायचे नाही, लढायचे अशी घोषणाच केली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी पक्षास निवडणूक आयोगाने एका योद्ध्याच्या हाती तुतारी दिली आहे. ही तुतारी घेऊन 84 वर्षांचे शरद पवार परत एकदा लढाईला उतरलेत. हा संकेत वेगळाच संदेश देऊन जातो. महाराष्ट्र युद्धासाठी तयार आहे. युद्ध अधर्माविरुद्ध आहे.. अन् या युद्धाची तुतारी वाजवायचे काम निवडणूक आयोगानेच केले आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

R

Sharad Pawar, Tutari
Jayant Patil : खळबळजनक! अजित पवार नाही तर जयंत पाटील फडणवीसांची पहिली पसंत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com