Ajit Pawar, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

NCP Split News : दादा की साहेब ! राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुठल्या गटाचे जास्त वजन; 'या' दिवशी होणार स्पष्ट

NCP Crisis In Maharashtra : राष्ट्रवादीतील दोन्ही गटांच्या बैठकीकडे राज्यासह देशाचे लक्ष

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात वर्षभरातच रविवारी (दि. २) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंड केले. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अचनाक घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांना धक्का दिला. यावेळी अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह इतर काही नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. (Latest Political News)

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. सध्या शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे किती आमदार आहेत, याबाबत स्पष्टता नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोण कोणत्या गटात असणार हे दोन दिवसांत स्पष्ट होईल. दरम्यान, या आमदारांच्या गटाची यादी समोर आली आहे. आता आपल्या गटाचे संख्याबळ स्पष्ट करण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार दोघांनीही एक बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटाच्या या बैठका बुधवारी (ता. ५ जुलै) रोजी होणार आहेत. या बैठकांकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांची बैठक बुधवारी बोलावली आहे. ही बैठक वांद्य्रातील मॅट कॉलेजमध्ये होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याच दिवशी शरद पवार यांच्याही समर्थक आमदारांच्या बैठकीचे आयोजन आहे. शरद पवार वाय.बी. सेंटरमध्ये ही बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतरच राष्ट्रावादी काँग्रेसमधील साहेब की दादा या गटापैकी कोणत्या गटाला जास्त समर्थन मिळाले, कुणाचे जास्त आमदार आहेत, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, कोण कुणाकडे आहे, याची संभाव्य यादी समोर आली आहे.

अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार

1) अजित पवार (बारामती)

2) छगन भुजबळ (येवला)

3) दिलीप वळसे पाटील (आंबेगाव)

4) हसन मुश्रीफ (कागल)

5) धनंजय मुंडे (परळी)

6) धर्मरावबाबा आत्राम (अहेरी)

7) माणिकराव कोकाटे (सिन्नर)

8) नरहरी झिरवाळ (दिंडोरी)

9) आदिती तटकरे (श्रीवर्धन)

10) दत्तात्रय भरणे (इंदापूर)

11) दौलत दरोडा (शहापूर)

12) शेखर निकम (चिपळूण)

13) सरोज अहिरे (देवळाली)

14) किरण लहाने (अकोले)

15) अशोक पवार (शिरूर)

16) संजय बनसोडे (उदगीर)

17) अनिल पाटील (अमळनेर)

18) सुनील टिंगरे (वडगाव शेरी)

19) निलेश लंके (पारनेर)

20) सुनील भुसारा (विक्रमगड)

21) अतुल बेनके (जुन्नर)

22) संग्राम जगताप (अहमदनगर)

23) आशुतोष काळे (कोपरगाव)

24) चेतन तुपे (हडपसर)

25) सुनील शेळके (मावळ)

26) अण्णा बनसोडे (पिंपरी)

27) दिलीप मोहिते (खेड आळंदी)

शरद पवार यांच्यासोबत असलेले आमदार

1) जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा)

2) राजेश टोपे (घनसावंगी)

3) अनिल देशमुख (काटोल)

4) जयंत पाटील (इस्लामपूर)

5) बाळासाहेब पाटील (अहमदपूर)

6) शामराव पाटील (कराड उत्तर)

7) प्रकाश सोळंके (माजलगाव)

8) राजेंद्र शिंगणे (सिंदखेड राजा)

9) नवाब मलिक (अणुशक्ती नगर)

10) प्राजक्त तनपुरे (राहुरी)

11) बाळासाहेब आजबे (आष्टी)

12) राजू कारेमोरे (तुमसर)

13) मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव)

14) दीपक चव्हाण (फलटण)

15) अशोक पवार (शिरूर)

16) मकरंद जाधव (वाई)

17) चंद्रकांत नवघरे (बसमत)

18) इंद्रनील नाईक (पुसद)

19) मानसिंग नाईक (शिराळा)

20) नितीन पवार (कळवण)

21) रोहित पवार (कर्जत जामखेड)

22) राजेश पाटील (चंदगड)

23) सुमन पाटील (तासगाव कवठे महाकाळ)

24) दिलीपराव बनकर (निफाड)

25) यशवंत माने (मोहोळ)

26) बबनराव शिंदे (माढा)

27) संदीप क्षीरसागर (बीड)

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT