Anand Paranjpe On Bharat Gogawale Sarkarnama
मुंबई

Anand Paranjpe On Bharat Gogawale : मंत्री गोगावलेंच्या दारूगोळ्यावर अजितदादांच्या पठ्ठ्यानं फिरवलं पाणी

NCP Thane Anand Paranjpe Defends Rashmi Thackeray Refutes Bharat Gogawale Claims on Raj Thackeray Chhagan Bhujbal, Narayan Rane : शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेत रश्मी ठाकरे यांच्या हस्तक्षेपाच्या मंत्री भरत गोगावले यांच्या आरोपांची आनंद परांजपेंनी हवा काढून घेतली.

Pradeep Pendhare

Maharashtra political news : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरे निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याचा आरोपांची हवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील प्रवक्ते आनंद परांजपे यांनी काढून घेतली.

भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर वाढत असतानाच, राष्ट्रवादीबरोबर देखील रायगडच्या पालकमंत्रिपदावर घमासान सुरू आहे. मंत्री गोगावले यांनी राज ठाकरे, छगन भुजबळ आणि नारायण राणे पुन्हा शिवसेनेत येणार असल्याचं सांगताना, रश्मी ठाकरेंच्या हस्तक्षेपाच्या राजकारणावर टीका करत बाॅम्ब फोडला. पण दारूगोळ्यावर काही क्षणात अजितदादांच्या पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पाणी ओतत, मंत्री गोगावलेंचे मनसुबे उधळून लावली.

राष्ट्रवादीचे (NCP) आनंद परांजपे यांनी शिवसेना मंत्री भरत गोगावले यांच्यावर जोरदार निशाणा साधताला. 'शिवसेनेने तुम्हाला ओळख दिली, राजकारणात वर आणले, त्यांच्यावर अशा प्रकारे आरोप करणे चुकीचे आहे. मी देखील शिवसेनेत काम केले आहे. रश्मी ठाकरे कुटुंब वत्सल आहेत. निर्णय प्रक्रियेमध्ये रश्मी ठाकरे यांचा कधीच हस्तक्षेर नसायचा', असे ठामपणे आनंदर परांजपे यांनी सांगून मंत्री गोगावलेंच्या दाव्याची हवा काढून घेतली.

'जिल्हा परिषद सभापतीपासून ते आमदार होण्यापर्यंत शिवसेनेने तुम्हाला ओळख दिली. ही ओळखच तुम्ही विसरलात, तर दुर्दैवी आहे. तसंच जर शिवसेनेने (Shivsena) मोठे केल आणि अशा वेळेस रश्मी वहिनींवर आरोप करत असाल तर त्यांचे राजकारण दुर्दैव आहे', असा टोला देखील आनंद परांजपे यांनी लगावला.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी पूर्वीच शिवसेना सोडल्यानंतर पुन्हा जाण्याचा विचार नव्हता, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मंत्री गोगावलेंच्या दाव्याला अर्थच उतर नाही, असे देखील परांजपे यांनी सांगितले.

इम्तियाज जलीलांना फटकारलं

'AIMIM'च्या इम्तियाज जलील यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जातीच्या राजकारणाला सुरूवात केल्याच्या प्रतिक्रियेवर देखील आनंद परांजपे यांनी सुनावलं. इम्तियाज जलील हिंदू-मुस्लिम करतात. बाळासाहेबांबाबत बोलायची त्याची लायकी नाही, असं एका वाक्यात परांजपेंनी फटकारलं.

मंत्री गोगावलेंनी काय म्हटलं...

मंत्री भरत गोगावले यांनी ठाकरे बंधू एकत्र येतील असं वाटत नाही, असा दावा करताना, ज्यावेळेला खरोखर संधी होती, त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी ती गमावली. त्यांनी अनेक संधी गमावल्या. कारण त्यावेळेला नारायण राणे आमच्या जवळ येत होते. मंत्री छगन भुजबळसाहेब पण येत होते. पण उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही, कुणाचं ऐकलं ते समजून घ्या, असं म्हणत त्यांनी रश्मी ठाकरेंवर निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT