Aditi Tatkare, Bharat Gogawale Sarkarnama
मुंबई

NCP Vs Shivsena : पुन्हा अदिती तटकरे पालकमंत्री नकोच; शिंदे गटाने उपसले हत्यार

सरकारनामा ब्यूरो

Bharat Gogawale Oppose Aditi Tatkare : महाराष्ट्रात रविवारी (ता. २ जुलै) राजकीय भूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार उपमुख्यमंत्री बनले.अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यात सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारमध्ये सहभागी होताच शिंदे गटातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Latest Political News)

अदिती तटकरे मंत्रिमंडळात आल्याने शिंदे गटातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तटकरे यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यास आमदार भरत गोगावले यांनी विरोध दर्शवला आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेसाठी राखीव आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांना जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपच्या सर्व सहा आमदारांचा विरोध असल्याचा दावा गोगवले यांनी केला आहे.

सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे रायगडचे पालकमंत्री पद आता तटकरे यांना मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेसाठी राखीव असलेली मंत्रिपदे राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे शिंदे गटात प्रचंड नाराजी आहे. त्यातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्याने राज्य सरकारवर वेळोवेळी टीका होत होती. हे लक्षात घेऊनच आदिती तटकरे यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

दरम्यान, आदिती तटकरे यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. तटकरे २०१७ ते २०१९ या काळात रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. ३० डिसेंबर २०१९ ते २९ जून २०२२ पर्यंत त्या महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये मंत्री होत्या. अदिती तटकरे यांनी पर्यटन, माहिती आणि जनसंपर्क, कायदा आणि न्यायव्यवस्था यासह अनेक विभागांची जबाबदारी पार पाडली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT